देह निरांजन झाला – माधव गिर

तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या  मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता – ‘वैशाख मासातील वैद्य दशमीचा.’ 

पुढे वाचा