रामो राजमणिः सदा विजयते.. -श्रीराम ग. पचिंद्रे

भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्‍याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, ‘‘कोण आहेस तू? आणि माझ्याडून काय हवंय तुला?’’ 

पुढे वाचा

कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र 

महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हजारो वर्षे त्यांच्या चरित्राची मोहिनी जनमानसावर कशी राहते, अनेक संत, सत्पुरुष केवळ रामनामाने आपली आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला नेऊन जीवनाची कृतार्थता साधतात. काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवन?

पुढे वाचा