भूमिका न घेणं हीच भूमिका!

मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.

पुढे वाचा

मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्‍या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत…

पुढे वाचा

बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध

काठियावाड हे गुजरातमधलं एक ठिकाण. तेथील ख्यातनाम वकील, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या हरजीवनदास काठीयावाडी यांची गंगा ही लाडकी कन्या. गंगाला चित्रपट, नाटक, अभिनयाची आवड. चौदा वर्षाची असताना एका मैत्रिणीकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्यात हरवून गेली.

पुढे वाचा

अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत.

पुढे वाचा

माइंड रीडर (कथा) – राजीव तांबे

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सॅम बर्डींनी फोन घेतला. भारताचे पंतप्रधान म्हणाले, ‘‘एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय कामासाठी तुमची मदत हवी आहे. लगेचच दिल्लीत पोहोचा. आता यानंतर श्री. अशोक शर्मा तुमच्याशी संपर्क साधतील.’’

पुढे वाचा

एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.

छ. शिवरायांसाठी ‘युद्ध’ हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे ‘साध्य’ होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ?

पुढे वाचा

छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. रायगड ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून ओळखली जावू लागली. रायगडावर महाराजांनी राजदरबारापासून विविध इमारती बांधल्या. रायगड हा सुसज्ज गड तयार केला. रायगडावरील भव्य, देखणी व सुसज्ज बाजारपेठ हे शिवाजी राजांच्या व्यापारविषयक धोरणांवर प्रकाश टाकते.

पुढे वाचा

व. पु. काळे – माझे दोस्त!

ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्‍यावर बसून आम्ही  यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’  ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’  मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून झर्रझर्र ओळी कागदावर उमटत होत्या. का माहीत नाही, पण त्यावेळी हा लेख लिहून झाल्यावर मी खूप…

पुढे वाचा

सर्वधर्मसमभावाचं प्रतीक दारा शुकोह…!

केंद्र सरकार एनआरसी राबविण्याच्या तयारीत आहे. शिवाय २०२४च्या निवडणुकांपूर्वी समान नागरी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक सांस्कृतिक उपक्रमाचं नियोजन सरकार करतंय. ते म्हणजे

पुढे वाचा

नोंदी

एक पत्रकार, ब्लॉगर आणि लेखकाने समाजमाध्यमावर केलेल्या या नोंदी आहेत. मजकुराच्या आशय आणि आकृतीबंधात सलग सूत्र नाही. असे असले तरी या कथनातून पत्रकार आणि लेखकासोबतच एक सजग, संवेदनशील माणूसही व्यक्त होत जातो आणि वर्तमानासोबतच दडलेल्या गतकातर आठवणींचाही एक पट मग उलगडतो. – संपादक –

पुढे वाचा