कलरफुल नेता

काँग्रेस पक्षात श्रेष्ठींपुढे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकणार्‍या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे वसंत साठे. मुळचे नाशिकचे असलेले वसंतराव साठे वयाच्या सतराव्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. प्रजा सोशालिस्ट पार्टीकडून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्षात म्हणजे 1960 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अकोल्यातून ते खासदार म्हणून निवडून गेले. काँग्रेस पक्षाला ‘हात’ हे निवडणूक चिन्ह मिळवून देण्यात या मराठमोळ्या नेत्याचा मोठा वाटा आहे. इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या साठे…

पुढे वाचा

ही तर मराठी प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!

प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!

मराठी वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र त्या काही खर्‍या नाहीत. आजही चांगले वाचक चांगल्या साहित्यकृतीच्या प्रतीक्षेत असतात. ते नेहमी इंटरनेट, ग्रंथालये आदी ठिकाणी दर्जेदार आणि वाचनीय साहित्य शोधत असतात. वाचकांची ही आवड लक्षात घेऊन पुण्यातील ‘चपराक’ प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील यांनी वर्षभरात तब्ब्ल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला असून, या संकल्पनेला मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मराठी साहित्याला विशेषतः नवोदित लेखकांच्या साहित्याला लागलेलं प्रतिसादशून्यतेचं ग्रहण संपविण्यासाठीच ‘ग्रंथ निर्मितीचे’ शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. मात्र या संकल्पनेचा मूळ उद्देश काय? मराठी…

पुढे वाचा