कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न

कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न

जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्‍व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे पार पडली. यात सात जिल्ह्यातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. या कार्यशाळेत दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजानांची माहिती दिली. कृषी पर्यटनासंबंधी, भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास…

पुढे वाचा

भूखंड खरेदीचा कानाला खडा

भूखंड खरेदीचा कानाला खडा

ह्या गोष्टीला आता 15 वर्षे झाली असतील. अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते. ते कसे… 2003ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असताना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली की आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका हॉस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न घ्यावे. हे सगळे डोक्यात यायचे कारण आमच्या…

पुढे वाचा

‘हरवलेलं पत्र’

हरवलेलं पत्र...

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवं असतं. संवाद साधायला कुणीतरी हवं असतं. विचारविनिमय महत्त्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘पोस्टमन’. पूर्वी संवाद साधण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते. डाकसेवा सुरु झाल्यामुळे लोक लिहू लागली, पत्र पाठवू लागली, एकमेकांशी संवाद साधू लागली. पोस्टमन…

पुढे वाचा

आठवणींची मोरपिसं

आठवणींची मोरपिसं

सारा निसर्गच जणू रंगांनी भरलाय नि भारलायही. रंगांची ही जादू मनाला भुरळ घालते. नेत्रांना एक सुखद जाणीव देते. सारा निसर्ग हिरव्या रंगाची जादू तर करतोच पण त्याचबरोबर तो इतर अनेक रंगांची निर्मितीही करतो. मग ते उडते चमत्कार असतील, निळं पाणी असेल, रंगीत मासे असतील! सारी रंगांची तर दुनिया! या सार्‍या रंगांच मिश्रण असलेला एक अद्भुत पक्ष्यी इथं आहे आणि त्या पक्ष्याचं तरल, मऊ, मुलायम पीस आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मोरपीस! खूप खूप वर्ष मागे गेलात ना अगदी बालपणात, तर आठवेल किती कौतुकानं, आवडीनं ते मोरपीस आपण पुस्तकात ठेवलं होतं. आपल्या…

पुढे वाचा