कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न

कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न

Share this post on:

जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्‍व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे पार पडली. यात सात जिल्ह्यातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.

या कार्यशाळेत दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजानांची माहिती दिली. कृषी पर्यटनासंबंधी, भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास संपर्क करा असे आवाहन शेतकर्‍यांना केले.

कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यामध्ये विविध बँकिंग योजना, पर्यटन कर्ज मुद्रा योजना यांचे मार्गदर्शन सचिन मस्के यांनी केले. शशिकांत जाधव यांनी कृषी पर्यटनातीत इतर कोणकोणते जोडव्यवसाय करू शकतो, शहरातील पैसा ग्राणीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसा आणू शकतो, कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्या प्रामाणात कशी उपलब्ध आहे याची माहिती दिली.

कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नवमाध्यमे, डिजिटल तसेच समाजमाध्यमे किती महत्त्वाची आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्र, सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, किवर्ड आणि कन्टेन्टचा वापर करून आपल्या वेबसाईटवर कसा आणू शकतो याविषयी कृषी पर्यटन विश्‍वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनाचे भविष्य, यातील संधी, सद्यस्थिती, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन मनोज हाडवळे यांनी केले. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील यशस्वी झालेला द्राक्ष महोत्सवासारखे महोत्सव कशा पद्धतीने राबवू शकतो याविषयी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!