बोलक्या रेषा

बोलक्या रेषा

सकाळचा प्रहर जसजसा पुढे सरकतो तसतशी संवादाची साखळीही एक एक करुन पुढे सरकते. ज्योत से ज्योत जलाते चलो सारखं कडी से कडी मिलाते चलो, संभाषण धारा बढाते चलो असंच काहीसं. शब्द, संवाद हा मानवी जीवनातला अहम हिस्सा आहे. न बोलणं ही माझ्यासाठी शिक्षा आहे, सांगणारी कितीतरी माणसं तुम्हाला भेटतील. बोलणं ही काहींसाठी भावनिक गरजही असू शकते तर काहींचं जगणं हे त्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतं. संवाद हा नेहमी चतुर असावा. तो करताना समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला दाखवता येण्याचं कौशल्य त्या संवादात असावं.

पुढे वाचा

गृहस्थी आणि गृहिणी

गृहस्थी आणि गृहिणी

स्त्री आणि स्वयंपाकघर यांचं एक अतुट नातं आहे. मला जर तुम्ही विचारलं, ‘‘घरातील सर्वात आवडती जागा कोणती?’’ तर मी उत्तर देईन ‘‘स्वयंपाकघर!’’ याला कारणही तसंच आहे. घरातल्या दुसर्‍या खोल्या या विभागुन घ्याव्या लागतात. प्रत्येकाची आवड आणि निवड याला अनुसरुन मांडणी व आखणी करावी लागते पण इथं मात्र साम्राज्य माझं असतं. हुकमत माझी असते, अधिकारही माझा असतो. कुठे कायपासून, कुठे कधीपर्यंत, मुशाफिरी निर्विवाद आपलीच असते. या खोलीतले खजाने, शोध, प्रयोग सार्‍याला ‘मी’चा स्पर्श असतो. या स्पर्शातली जादु कुटुंबाला बांधून ठेवते. दिवस उजाडताना पावलं आपोआप या खोलीकडे वळतात. सुव्यवस्थित, नीटनेटकं लावलेलं ते…

पुढे वाचा

आठवणींची मोरपिसं

आठवणींची मोरपिसं

सारा निसर्गच जणू रंगांनी भरलाय नि भारलायही. रंगांची ही जादू मनाला भुरळ घालते. नेत्रांना एक सुखद जाणीव देते. सारा निसर्ग हिरव्या रंगाची जादू तर करतोच पण त्याचबरोबर तो इतर अनेक रंगांची निर्मितीही करतो. मग ते उडते चमत्कार असतील, निळं पाणी असेल, रंगीत मासे असतील! सारी रंगांची तर दुनिया! या सार्‍या रंगांच मिश्रण असलेला एक अद्भुत पक्ष्यी इथं आहे आणि त्या पक्ष्याचं तरल, मऊ, मुलायम पीस आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मोरपीस! खूप खूप वर्ष मागे गेलात ना अगदी बालपणात, तर आठवेल किती कौतुकानं, आवडीनं ते मोरपीस आपण पुस्तकात ठेवलं होतं. आपल्या…

पुढे वाचा

नीतांजली – भासाची कथा-व्यथा

मागे जाणवणारी ती सळसळ, दूरवरुन आलेली अस्पष्टशी साद, गाण्याची हलकी निसटती लकेर! असंच काहीसं क्वचित कधी जाणवणारं. विश्वास आणि अविश्वास याच्या कडेलोटावर असतो आपण! संध्याकाळ दाटून आलेल्या वातावरणात एक अनोखी गुढता असते. मन येणार्‍या पावलांची चाहूल घेत असतं. मनाची अधीरता शिगेला पोहचलेली असते अन् दारावरील टकटक स्पष्ट ऐकू येते. जलद पावलं दाराकडे पटपट जातात. दारं उघडून पहावं तर समोर कुणीच नसतं. मग ती टकटक कुठुन झाली? आवाज खरा की अधीर मनाला झालेला भास? आणि मग मनातील आंदोलनं सुरु होतात. हा मनाचा खेळ असतो की प्रकर्षांने वाटणारी ओढ? भास की आभास?…

पुढे वाचा

नीतांजली – प्रेमदिनाचे चिंतन!

नीतांजली - नीता जयवंत यांचा लेख

प्रेमाचा दिवस! कल्पना मोठी छान आहे, पण मग फक्त एक दिवसच प्रेमाचा असतो का? आणि बाकी सारे दिवस ते कशासाठी? 14 फेब्रुवारी साजरा करणे, त्यानिमित्त फुले भेटी, मनीचे भाव व्यक्त करणे याला विरोध करावा किंवा व्हावा असं मला अजिबात वाटत नाही! पण फक्त एक दिवस प्रेमाचे गोडवे गावे अन् मग सारेच विसरुन जावे, हे कुठेतरी टोचतं. पाश्‍चात्यांची परंपरा म्हणून घ्यावं की… की घेऊ नये? हा ज्यांचा त्याचा प्रश्‍न! पण प्रेमाची नाती आणि त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मात्र आयुष्यभर जपावा. हे हा दिवस अधोरेखीत करतो असं मला वाटतं. प्रेम ही एकदिवसीय…

पुढे वाचा