मराठीतील पहिलं वाक्य

मराठीतील पहिलं वाक्य

जैसी दीपामाजी दिवटी का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी तैसी भाषामध्ये मर्‍हाटी सर्वोत्तम! संत ज्ञानेश्‍वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला.

पुढे वाचा