गंधांची अजब दुनिया

गंधांची अजब दुनिया

सुगंधाची अशी एक मोहक अगोचर दुनिया असते. या दुनियेला वेगवेगळ्या खिडक्या किंवा झरोके असतात. कधी सुगंध या झरोक्यातून प्रवेशतात तर कधी आपण सुगंधांकडे ओढले जातो. अगदी पुराण काळापासून सुवास किंवा अत्तराचे वेड माणसाला आहे. हे सुगंध माणसाला वेडं करतात. आपली पत जाऊ नये म्हणून थेंबभर अत्तरासाठी कुणा बादशहाने अत्तराने भरलेला अख्खा हौद खुला केला होता म्हणतात.

पुढे वाचा

गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा फारच भव्य, व्यापक, उदात्त आणि आदर्श शब्द आहे. त्यामानाने शिक्षक हा मर्यादित अर्थ असणारा व्यवहारी शब्द आहे. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात गुरू हा शब्द बहुधा आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो. ‘गुरूवीण उनभव कैसा कळे?’ असा प्रश्‍न संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी विचारलेला आहे. अर्थात गुरूशिवाय आध्यत्मिक अनुभव येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक गुरूंना सद्गुरू असेही म्हणतात. या आध्यत्मिक गुरूंचे किंवा सद्गुरूंचे माहात्म्य संतसाहित्यात आपणास पानापानांवर असलेले दिसून येते. भारतीय आध्यात्मिक क्षेत्रात अशा गुरूशिष्यांच्या शतावधी परंपरा आणि जोड्या असलेल्या आपणास दिसतात.

पुढे वाचा

आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती; आणि देशाचे भवितव्य!

आजच्या सामाजिक, राजकीय वास्तवाचा द. ता. भोसले यांनी घेतलेला आढावा.

आजचा समाज कसा आहे, याची अनेक उत्तरे संभवतात. आजच्या काळाकडे आपण कसे पाहतो, ते पाहत असताना कोणत्या गोष्टींवर भर देतो आणि आपली मनोधारणा कशी आहे यावरही उत्तरे अवलंबून असतात पण तटस्थ वृत्तीने पाहिले तर स्थूलपणे असे म्हणता येईल की, आजचा समाज तंत्रज्ञानाचा झपाट्याने गुलाम होत चाललेला आहे. परग्रहावर निवासस्थान, सागरतळाशी वसतिगृहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होत चालला आहे आणि दिशाहीन गरगरणे ही आजच्या समाजाची ठळक ओळख झालेली आहे. गतिमान काळाची शिकार, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या आसक्तीची शिकार, जगण्यासाठी कराव्या लागणार्‍या स्पर्धेशी शिकार आणि कुटुंब, नाती, निसर्ग, भूमी आणि आत्मिक समाधान यापासून तुटत…

पुढे वाचा

ही नोकरी सोड

‘काय रे कुठं काम करतो? पगार किती आहे?’ हे बोलणं ऐकू आलं आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मलाही असे प्रश्‍न विचारणारे भरपूर होते. तेव्हाची ही गोष्ट.

पुढे वाचा

जयाजीपेक्षा महत्त्वाचा आहे शेतकरी संपाचा विजय

शेतकरी नेते शरद जोशी यांनी संपूर्ण हयात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर खर्ची घातली मात्र राज्यातील वा देशातील शेतकरी कधीच एकजुटीने जागृत झाला नाही. विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक सधनता ही या असंघटितपणाला कारणीभूत होती. यामुळे बळीराजाने काळानुरूप स्वतःत आणि शेती पध्दतीत बदल करत आपल्या भवितव्याची काळजी  घेतली नाही.

पुढे वाचा

पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ

पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ती रणरागिणी ताराराणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथावर. तसे दोघेही समकालीन. ताराराणीने 1700 ते 1707 पर्यंत संताजी व धनाजीसारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही.

पुढे वाचा