साहित्यिक दुष्काळ निवारणारे ‘द.ता.’

आम्हाला गुरुजींनी व्याकरण शिकवताना तीन काळ शिकवले. वर्तमानकाळ सोडला तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आम्हाला आणखी एका काळाला सामोरं जावं लागलं. तो काळ म्हणजे ‘दुष्काळ…!’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारे पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक डॉ. द. ता. भोसले म्हणजे एक चालतंबोलतं विद्यापीठच म्हणायला हवं. ग्रामीण साहित्याच्या प्रांतात त्यांनी फक्त यथेच्छ मुशाफिरीच केली नाही तर खेड्यापाड्यातील अनेक लिहित्या अंकुरांना त्यांनी बळ दिलं आणि त्यातले अनेकजण आज डौलदार वृक्ष म्हणून साहित्यशारदेच्या दरबारात प्रभावीपणे पुढं आलेत. 8 मे 1935ला जन्मलेल्या भोसले सरांचा व्यासंग अफाट आहे. रयत शिक्षण…

पुढे वाचा

आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती; आणि देशाचे भवितव्य!

आजच्या सामाजिक, राजकीय वास्तवाचा द. ता. भोसले यांनी घेतलेला आढावा.

आजचा समाज कसा आहे, याची अनेक उत्तरे संभवतात. आजच्या काळाकडे आपण कसे पाहतो, ते पाहत असताना कोणत्या गोष्टींवर भर देतो आणि आपली मनोधारणा कशी आहे यावरही उत्तरे अवलंबून असतात पण तटस्थ वृत्तीने पाहिले तर स्थूलपणे असे म्हणता येईल की, आजचा समाज तंत्रज्ञानाचा झपाट्याने गुलाम होत चाललेला आहे. परग्रहावर निवासस्थान, सागरतळाशी वसतिगृहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होत चालला आहे आणि दिशाहीन गरगरणे ही आजच्या समाजाची ठळक ओळख झालेली आहे. गतिमान काळाची शिकार, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या आसक्तीची शिकार, जगण्यासाठी कराव्या लागणार्‍या स्पर्धेशी शिकार आणि कुटुंब, नाती, निसर्ग, भूमी आणि आत्मिक समाधान यापासून तुटत…

पुढे वाचा