दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.
पुढे वाचाTag: Sagar Surwase
शिवसैनिकांचा लहानपणा; सत्तेसाठी शहाणपणा!
शिवसेना हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांच्या असीम धैर्याचे आणि संघटन कौशल्याचे. त्यानंतर दुसरे चित्र उभे राहते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. कारण महाराष्ट्रातील तरुणाईची सळसळती ऊर्जा म्हणजे शिवसेना आहे. तारुण्यात आलेल्या युवक – युवतीला व्यवस्थेबद्दल असणारी चीड व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवसेना!
पुढे वाचाकॉंग्रेसला ‘लकवा’ तर ‘घड्याळाची’ ‘चार्जिंग डाऊन’
सध्या महाराष्ट्रात पक्षनिष्ठा आणि घराणेशाहीवरुन मोठी रंगतदार चर्चा सुरु आहे. गल्ली-बोळातील सोम्या-गोम्यापासून ते अगदी विचारवंतांपर्यंत सगळेच निष्ठेच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत! मात्र असं असलं तरी दुसरी बाजू कोणीही पहायला तयार नाही. समाजात राजकारण सोडून इतर असे अनेक व्यवसाय आहेत की जिथे घराणेशाहीच चालते. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकीलाचा मुलगा वकील, क्रिक्रेटरचा मुलगा क्रिकेटर, सनदी अधिकार्याचा मुलगा सनदी अधिकारी आपल्याला चालतात; मात्र राजकारण्याच्या मुलाबाबत घराणेशाहीचा आरोप होताना पहायला मिळतो. अर्थात कोणत्याही राजकारण्यांचे समर्थन करण्याचा हेतू नाही मात्र स्वतःला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा न्याय काय कामाचा?…
पुढे वाचाराजकारणातील ज्योतिषी की विदुषक ?
खूप मोठ्या अपेक्षा असणार्या व्यक्ती किंवा संघटनेकडून केवळ पोकळ घोषणाच होत राहिल्या की मग कालांतराने त्यांचे हसू होऊ लागते. त्याचेच आजच्या काळातले जितेजागते उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना! कारण नुकताच 9 मार्च रोजी त्यांच्या पक्षाने तेरावा वर्धापनदिन साजरा केला. या तेरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय कमावले? काय गमावले? पक्ष संघटना म्हणून आपण किती सक्षम वा कमकुवत झालोय याचे सिंहावलोकन करणे गरजेचे असताना केवळ मोदी, भाजप, शाह, डोवाल आदींवर तोंडसुख घेण्यातच आपल्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला. एक अपयशी संघटक म्हणून यापेक्षा मोठा पुरावा तो काय? आपण कोणीतरी…
पुढे वाचातरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’
‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नव्या दमाच्या प्रतिभावंत लेखकाचं आवर्जून वाचा,’ असं सांगणारे दिग्गज साहित्यक्षेत्रात दुर्दैवानं कमी झालेत. जे थोडेफार आहेत त्यांच्यामुळे हा साहित्यगाडा अव्याहतपणे सुरू आहे. अशाच गुणग्राहक लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक, विचारवंत डॉ. द. ता. भोसले. उमलत्या अंकुरांना बळ देण्यात भोसले सर कायम आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांनी लावलेली अनेक रोपटी आज फुला-फळांनी बहरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा मला एकदा फोन आला. ते म्हणाले, ‘‘संपादक महोदय, आमचा सोलापूर जिल्हा म्हणजे प्रतिभावंतांची खाणच आहे. काही कारणानं त्यातले काही अस्सल हिरे दुर्लक्षित राहिलेत.…
पुढे वाचाजयाजीपेक्षा महत्त्वाचा आहे शेतकरी संपाचा विजय
शेतकरी नेते शरद जोशी यांनी संपूर्ण हयात शेतकर्यांच्या प्रश्नावर खर्ची घातली मात्र राज्यातील वा देशातील शेतकरी कधीच एकजुटीने जागृत झाला नाही. विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक सधनता ही या असंघटितपणाला कारणीभूत होती. यामुळे बळीराजाने काळानुरूप स्वतःत आणि शेती पध्दतीत बदल करत आपल्या भवितव्याची काळजी घेतली नाही.
पुढे वाचा