‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार

‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे, (प्रतिनिधी) : ‘चपराक‘ने प्रकाशित केलेल्या सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीला ऑगस्टमध्ये दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी, गदिमा प्रतिष्ठान व नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगोला तालुक्यातील चोपडीचे सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.

पुढे वाचा

स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न

स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न

सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी ‘चपराक प्रकाशन’ची सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ ही कादंबरी वाचून दिलेली प्रतिक्रिया. ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी या लिंकला भेट द्या – http://shop.chaprak.com/product/kaalijkaata/

पुढे वाचा

चोपडी ते मुंबई – ‘काळीजकाटा’ कादंबरीचा अनोखा प्रवास

चोपडी ते मुंबई - 'काळीजकाटा' कादंबरीचा अनोखा प्रवास

लहानपणापासून विविध प्रकारच्या संघर्षानं जगण्याचं बळ दिलं. सकाळी बारा वाजेपर्यंत नाझरा विद्यामंदिर येथे कॉलेज करायचं आणि दुपारी एकनंतर चोपडी येथे त्यावेळी असणार्‍या गुंडा चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये पाच वाजेपर्यंत पडेल ते काम करायचं. दहावीत एकदा नापास झालेल्या विद्यार्थ्यानं बारावीत फक्त पास व्हावं एवढीच सगळ्यांची अपेक्षा! परिस्थिती माणसाला प्रत्येक वादळ झेलायला शिकवते. समाजाच्या वेदनांचे असंख्य डंख सोसायला शिकवते. याच परिस्थितीच्या शिकवणीतून मी खूप काही शिकलो. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची शाखा असणार्‍या नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी अतिशय तळमळीनं परिस्थितीचे चटके सोसणार्‍या माझ्यासारख्या अतिशय सामान्य मुलाला खूप काही दिलं. सर्वात मोठा…

पुढे वाचा