सृजनाचा सुंदर प्रवास

सृजनाचा सुंदर प्रवास

नाशिक येथील युवा पत्रकार आणि वक्ते किरण सोनार यांचा ‘हजार धागे सुखाचे’ हा वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह लवकरच ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित होत आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या सदिच्छा लाभल्या आहेत. त्यांच्या या भावना खास आपल्यासाठी… किरण सोनार यांच्या कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतील यासाठी विजयाताईंच्या या शब्दांशिवाय आणखी कोणतं परिमाण हवं? किरण सोनार या तरुण लेखकाजवळ एक सुंदर मन आहे, ज्यात कळवळा आहे, कणव आहे, सुंदरतेची अनोखी आस आहे आणि मनाच्या गाभार्‍यात शिवशंकराचं पुण्यशील अधिष्ठान आहे; जे माणूसपण असोशीनं जपतं आणि ते किरणच्या कथांमधन झिरपतं. हे तो कळवळ्याची…

पुढे वाचा