एके दिवशी अत्रे जातिल दुसरे दिवशी पित्रे रडतिल – घनश्याम पाटील

या महिन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो म्हणजे प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर! त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवल्याचे पुढे आले आहे. यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे, प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती असताना कार्यालयाचा ताबा, तेथील सुविधा, ऑडीसारख्या महागड्या गाड्या, आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव असे गंभीर विषय आहेत. त्यांच्या आईने तर हातात शस्त्र घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचे आणि जमिनी ताब्यात घेतल्याचेही काही व्हिडिओ प्रसारित झाले. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यातील दोषींवर कारवाई होईल का? आणि झालीच तर नेमकी काय होईल? हे येणाऱ्या काळात…

पुढे वाचा

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…

पुढे वाचा