मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक्ती केली जाते. सारे करूनही मराठी ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. केवळ उत्साही असेच कार्यक्रमाचे…
पुढे वाचा