विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची आज १७१वी जयंती! २० मे १८५० रोजी त्यांचा जन्म झाला. निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त अशी त्यांची ओळख! १८७४ साली त्यांनी ‘निबंधमाला’ हे मासिक प्रकाशन सुरु केले.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुणे येथे झाला. महान मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख. निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांचे ते वडील. पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्र्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या गुरुजींनी ‘बृहस्पती’ असे त्यांना संबोधिले होते. अलंकार, न्याय आणि धर्म ह्या तीन विषय प्रांतात त्यांचा गाढा व्यासंग होता. संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत त्यांचे प्राविण्य होते. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र इ. विषयांतही ते पारंगत होते. १८५२ मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरी स्वीकारली. त्यानंतर पुण्यात साहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’चे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस या पदांची त्यांनी जबाबदारी पार पाडली. ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये असताना मराठी शालापत्रक ह्या नियतकालिकाचेही त्यांनी काही वर्षे संपादन केले.
भाषांतरित लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय आहे. त्यांच्या पद्यरत्नावलीत (१८६५) कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद, सुभाषित शार्ङ्गधर ह्या संस्कृत ग्रंथातील श्लोकांच्या आधारे रचिलेल्या अन्योक्तीचा समावेश आहे. मेघदूताचा अनुवाद वाचकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. आरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टी (१९१३), शास्त्रीय विषयांवरील आधारित अनेकविद्या-मूल-तत्त्व संग्रह (१८६१), मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध, सॉक्रेटीस ह्याचे चरित्र (१८५२), सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचा अनुवाद (१८७३), विचार लहरी ह्या त्यांच्या सर्वच लेखनात त्यांची सूक्ष्म, चिकित्सक वृत्ती दिसून येते.
मराठी गद्याला त्यांच्या लेखणीने शुद्ध व डौलदार वळण लावले आणि विष्णुशास्त्र्यांच्या मराठी भाषाविषयक कार्याला आवश्यक अशी पूर्वपीठिका निर्माण करून ठेवली.
निबंधमालेतील निबंधातून त्यांनी ब्रिटिशसत्तेच्या अन्याकारक धोरणाविरुद्ध टीकात्मक लेखन तर केलेच पण त्याचबरोबर साहित्यिक लिखाणही केले.
निबंधमाला सतत सात वर्षे सुरु होते. शेवटचा अंक १८८३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजारपणामुळे १७ मार्च १८८२ रोजी त्यांचे निधन झाले. मराठी साहित्य आणि मराठी व्याकरण विभागात त्यांच्या लेखणीतून अजून अनेकानेक उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होऊन प्रगल्भ असे वाचन आणि अभ्यास साहित्य त्यांच्या हातून निर्माण झाले असते. अवघ्या ३२ वर्षांचे आयुष्य मिळालेल्या कर्तृत्ववान अशा या व्यक्तिमत्वाच्या अकस्मात जाण्याने महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची हानी झाली हे निश्चित!
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करून या लेखाच्या निमित्ताने त्यांना ही आदरपूर्वक शब्दांजली!
– प्रज्ञा पंडित
ठाणे
९३२०४४१११६
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल खूप छान माहिती मिळाली. मराठी साहित्य, व्याकरण, अनुवाद याविषयीचे त्यांचे लिखाण आणि देशभक्ती अभिमानास्पद आहे.
खूप महत्त्वपूर्ण माहिती! सुंदर लेख!