सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी ‘चपराक प्रकाशन’ची सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ ही कादंबरी वाचून दिलेली प्रतिक्रिया.
ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी या लिंकला भेट द्या – http://shop.chaprak.com/product/kaalijkaata/
प्रिय जवंजाळ सर…
स. न. वि. वि.
आपण पाठवलेली कादंबरी मिळाली. आनंद वाटला .उत्सुकतेने वाचू लागलो. तस तशी उत्कंठा वाढत गेली. जे साहित्य उत्कंठा वाढवते तेच खरे साहित्य असते. सावली एक निरागस तरुणी. साहित्यावर प्रेम करते. तिच्या कवितासंग्रहाला पारितोषकही मिळते .ज्यांनी तिला सन्मानित केले तेच संयोजक वासनेने पेटून उठून तिच्यावर बलात्कार करतो. एका उमलत्या कळीला चुरगळून टाकलं जातं. सावली दुभंगून जाते .तिला त्या नराधमांची किळस येते. आपल्या सुंदर देहाची ही घृणा येते. आता जगायचं कशासाठी ?एवढा भयानक प्रसंग एका अबोध तरुणीला उद्ध्वस्त करून टाकतो. मनाने आणि शरीराने ती दुबळी बनते. आता जगायचं कशासाठी ?ती आपली व्यथा कुणालाही सांगू शकत नाही. सतत मनात कुढत राहते . कवितेने जगण्यातला आनंद जरी हिरावून घेतला असला तरी संगीताने तिच्या जगण्यात उभारी दिली.सूर गवसला. वसंताने पेटीवर छेडलेले सुर, गाण्याची लकेर तिच्या आयुष्यात वसंत फुलवते. ती पुन्हा तो अपघात विसरून संगीतात भिजून जाते. वसंताचा सहवास हवाहवासा वाटतो. वसंताचा स्पर्श विखारी नाही, त्यात वासना नाही ,आंतरिक तळमळ आणि निष्कलंक प्रेम आहे. प्रेम म्हणजे ओरबडने नव्हे . वासनेत एखाद्याचा चोळामोळा करणे नव्हे, सर्वोच्च प्रेमाचे शिखर दोघांच्या वागण्यातून दिसून येते.सावलीला जगण्यातला खरा अर्थ येथे कळाला पण व्यावहारिक जगाला लग्न ,प्रपंच आणि प्रजोत्पादन करणे एवढाच अर्थ माहित आहे. म्हणून सावलीला लग्नबंधनात बांधण्याचा प्रयत्न आई-वडील करतात. सुखवस्तू ,श्रीमंत खानदानी घराण्यात तिला दिलं जात .आई-वडील आणि समाजाला आपण उचित कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळते, पण सावलीला आनंद वाटतो का ?मनाच्या विरोधात जाऊन ही तडजोड करणे म्हणजे घुसमट नव्हे काय? पहिला प्रसंग अनपेक्षित पण भयानक कधीही भरून न येणारी जखम, तर दुसरा प्रसंग सुखद जगण्याची रीत अर्थ सांगणारा आणि तिसऱ्या प्रसंगात पुन्हा मनाचा चेंदामेंदा. संस्कार प्रतिष्ठेसाठी दिलेला बळी. वास्तविक समाजातील हे वास्तव कुणी इतक्या हळुवारपणे यापूर्वी स्पष्ट केलेच नाही. स्त्री मनाचा कोंडमारा मांडलाच नाही. तो या कादंबरीत व्यक्त होतोय. स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न कौतुकास्पद पुन्हा अभिनंदन…..!
-योगीराज वाघमारे (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर) मो. 99 210 5 88 68
खूप खूप आभारी आहे सर जी