वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना ई-चलन

सोलापूर (प्रतिनिधी) :  स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या सोलापुरातील वाहतूक पोलीस प्रशासनही स्मार्ट होत आहेत. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर त्याला आता रोख रकमेऐवजी ई-चलन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा दंड संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे भरावा लागणार आहे. त्यामुळे व्यवहारात आणखी पारदर्शकता येणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियंत्रण कक्ष येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ई-चलन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुढे वाचा