माझं लिखाण!

ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण  केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर माझ्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर मी माझी लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहितो.

पुढे वाचा

माझीही एक पणती..

‘‘जीवनात तुम्हाला लिखाणाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?’’ असा प्रश्‍न मला कोणी केला तर माझं उत्तर असेल – ‘‘जीवनाकडूनच!’’ होय! आपण जर जगता-जगता या जीवनाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्याला ते खूपकाही सांगत असतं, दाखवत असतं. 2010 साली पुण्यात ‘एमबीए’ शिक्षणासाठी आलो आणि इथे त्या दोन वर्षांमध्ये जे जीवन जगलो ते अतिशय विलक्षण होतं.

पुढे वाचा

सदोबांचं बेगडी इतिहासप्रेम

महाराष्ट्रात विचारवंतांची कमतरता नाही. त्यातही पुणे शहरात तर नाहीच नाही. इथे एक विचारवंत शोधा; तुम्हाला दहा मिळतील. अशाच ‘विचारवंतांपैकी’ एक आहेत डॉ. सदानंद मोरे. ते घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. तत्त्वज्ञानात रमतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते देहूकर मोरे आहेत आणि थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख‘ असे रामदास स्वामींनी म्हटले असले तरी सध्या कोण कुणाचा वारसदार आहे हे सांगावे लागते. कुणी कुणाच्या संपत्तीचा वारसदार असते; तर कुणी विचारांचा! सदानंद मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे म्हणायला…

पुढे वाचा

शेती… संप आणि शेतीचे भवितव्य!

जयाजी सूर्यवंशी नामक नेता होण्याची घाई झालेल्या अर्धवट माणसामुळे शेतकरी संपासारख्या संपाला विचित्र वळण लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही अपरिपक्वपणा यानिमित्ताने पुढे आला. आता संपातून अखेरीस काय साध्य होईल हे सांगता येत नसले तरी यामुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्‍नांवर चर्चा करणे भाग आहे.

पुढे वाचा

पोलीस सेवेतला माणूस

2004 साली मी हैदराबादला ई टीव्ही मराठीमध्ये कामाला होतो. त्यावेळी आमचं कार्यालय रामोजी फिल्म सिटीत होतं. तेलुगु राज्यात, ती ही राजधानी हैदराबादमध्ये मराठी माणसांची संख्याही तशी मर्यादितच होती. कोटी परिसर सोडला, तर तशी फारशी मराठी माणसं हैदराबादमध्ये दिसायची नाहीत. पण, जी माणसं भेटायची ती खूपच जीव लावणारी असायची. त्यापैकीच एक होते, आयपीएस अधिकारी महेश भागवत.

पुढे वाचा

वन्यप्रेमींच्या सजगतेमुळे वाचली मोराची दृष्टी

सोलापूर (प्रतिनिधी) :  वाढत्या तापामानामुळे वन्य प्राण्यांचे आणि पक्षांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. सोलापुरातील माळरानावर वन्यप्रेमी पप्पू जमादार यांना एक मोर जखमी अवस्थेत आढळून आला होता. तापमानात झालेल्या वाढीमुळे या मोराच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. ही गोष्ट लक्षात येताच वन्यप्रेमी जमादार यांनी या मोराला सोलापुरातील प्राणीसंग्रहालयात आणले. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मोराच्या दोन्ही डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याचे दोन्ही डोळे झाकले गेले आणि तो माळरानावर भरकटला होता. त्यानंतर प्राणीमित्र मुकुंद शेटे यांनी पुढाकार घेत त्या मोरावर उपचार करुन घेतले. याकामी पशुवैद्यकीय अधिकारी घनशाम पवार, महापालिकेचे डॉ. भारत शिंदे,…

पुढे वाचा

कांदा गडगडला; शेतकरी कळवळला…

सध्या राज्यातील माध्यमांमध्ये एकच विषय रेटला जातोय तो म्हणजे राज्यसरकारकडून शेतकर्‍याच्या ’हातावर देण्यात आलेल्या तुरीचा.’ मात्र वास्तवापासून माध्यमं जाणीवपूर्वक कोसोदूर राहताहेत की त्यांचे आकलन कमी पडतेय हेच कळत नाहीय. कारण नाशिवंत असलेल्या कांद्याचा भाव दीड रुपयावर येऊन ठेपला असतानाही माध्यमं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतमालाच्या बाबतीत कांदा हा अल्पायुषी आहे तर तूर ही दीर्घायुषी आहे. असं असतानासुध्दा काही चार-दोन माध्यमं सोडली तर सर्वांनी सरसकट तुरीवर ताव मारायला सुरुवात केलीय. यातून नक्की कोणाचे फावणार आहे? याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? माध्यमं या विषयावर इतके आक्रमक का झालेत? या तूरकोंडीला केवळ…

पुढे वाचा

रेल्वे अधिकार्‍यांनी केला भाजप खासदारांचा अवमान

सोलापूर (प्रतिनिधी) :  एकीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे प्रशासन कात टाकत असतानाच दुसरीकडे सोलापूर रेल्वे प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी मात्र मोबाईल हाताळण्यात मग्न आहेत. हे अधिकारी मोबाईल हाताळण्यात इतके मग्न झाले होते की त्यांना आपल्या समोर खासदार बसलेत याचेही भान राहिले नाही. त्यामुळे  खासदार चांगलेच संतापले.

पुढे वाचा

वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना ई-चलन

सोलापूर (प्रतिनिधी) :  स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या सोलापुरातील वाहतूक पोलीस प्रशासनही स्मार्ट होत आहेत. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर त्याला आता रोख रकमेऐवजी ई-चलन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा दंड संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे भरावा लागणार आहे. त्यामुळे व्यवहारात आणखी पारदर्शकता येणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियंत्रण कक्ष येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ई-चलन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुढे वाचा