नव्या भारताची सुरवात

नव्या भारताची सुरवात

हिंदीमध्ये एक उक्ती आहे, ‘लातो के भूत बातो से नही मानते.’ पाकिस्तान हा जगातला एक देश असा आहे की ज्याला कुठलीच मानवी भाषा कळत नाही. त्याला कंबरेत लाथ किंवा बंदुकीचीच भाषा कळ्त असेल तर त्याच भाषेत त्याच्याशी संवाद करण्याला पर्याय उरत नाही पण प्रश्‍न पाकिस्तानचा असण्यापेक्षाही आपल्याच देशातल्या बुद्धीचे अजिर्ण झालेल्या दिवाळखोरांचा आहे. मागली तीन दशके पाकिस्तान सतत दहशतवाद व जिहादी हिंसेचे हत्यार उपसून भारतात थैमान घालत असतानाही त्याच्याशी संवाद साधावा आणि दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यात भारताने पुढाकार घ्यावा, अशी मुक्ताफळे उधळणारे बुद्धीमंत इथेच बसलेले आहेत. पाकिस्तानने कितीही उच्छाद…

पुढे वाचा

नीतांजली – भासाची कथा-व्यथा

मागे जाणवणारी ती सळसळ, दूरवरुन आलेली अस्पष्टशी साद, गाण्याची हलकी निसटती लकेर! असंच काहीसं क्वचित कधी जाणवणारं. विश्वास आणि अविश्वास याच्या कडेलोटावर असतो आपण! संध्याकाळ दाटून आलेल्या वातावरणात एक अनोखी गुढता असते. मन येणार्‍या पावलांची चाहूल घेत असतं. मनाची अधीरता शिगेला पोहचलेली असते अन् दारावरील टकटक स्पष्ट ऐकू येते. जलद पावलं दाराकडे पटपट जातात. दारं उघडून पहावं तर समोर कुणीच नसतं. मग ती टकटक कुठुन झाली? आवाज खरा की अधीर मनाला झालेला भास? आणि मग मनातील आंदोलनं सुरु होतात. हा मनाचा खेळ असतो की प्रकर्षांने वाटणारी ओढ? भास की आभास?…

पुढे वाचा

ओशोवाणी – श्रद्धेचा अर्थ

ओशोवाणी - श्रद्धेचा अर्थ

एका शिष्यानं ओशोंना विचारलं – ‘श्रद्धा म्हणजे काय?’ त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. त्यावेळी ओशो एक दिवस प्रवचन, एक दिवस प्रश्‍नोत्तरे असा कार्यक्रम करायचे. आलेल्या प्रश्‍नांतील निवडक प्रश्‍नांना ओशो उत्तरं देत. त्यामुळे इतर अनेकांच्या मनातील अनेक प्रश्‍न आपोआप मिटत. ओशो म्हणाले – श्रद्धा म्हणजे आतला डोळा. जसं जग पाहण्यासाठी आपल्याला दोन डोळे असतात तसा एक हृदयात तिसरा डोळा असतो, तो असतो श्रद्धा. त्या डोळ्यामुळं देवाचं दर्शन घडतं. श्रद्धेचा डोळा म्हणजे प्रेमाचा डोळा. काही गोष्टी फक्त प्रेमच समजू शकतं. दुसरं कोणीच नाही. जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत…

पुढे वाचा

एक मुलाखत

एक मुलाखत - रविंद्र कामठे यांचा लेख.

1989 चा तो काळ होता. म्हणजे त्याला आज जवळ-जवळ 30 वर्षे झालीत. तरीही असं वाटतंय की हे सगळं अगदी काल-परवाच घडलंय की काय! हो, अगदी खरं आहे हे. हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असंच काहीसं घडलेलं असणार, घडत असणार. मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हा रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय. चूक भूल माफ असावी! आकुर्डीतील एका खाजगी कंपनीमध्ये 1989-1994 ह्या काळात मी कामाला होतो.…

पुढे वाचा

डॉ. उज्ज्वला हरपळे यांची नियुक्ती

डॉ. उज्ज्वला हरपळे यांची निवड

लोणी काळभोर, (प्रतिनिधी) : डॉ. उज्ज्वला हरपळे यांची महिला व बालविकास राष्ट्रीय सल्लागार समितीवर केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी नियुक्ती केली असून फुरसुंगी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना डॉ. हरपळे यांनी सांगितले की, समाजसेवेचा वसा सासरे एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्यापासुन मिळाला असून यापुढे तो तसाच चालू राहिल. फुरसुंगी हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असेलेलं गाव. येथील एकनाथराव हरपळे गुरुजी यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांचे पुत्र डॉ. बाळासाहेब हरपळे आणि सूनबाई डॉ. उज्ज्वला यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. डॉ. हरपळे ऐश्‍वर्या…

पुढे वाचा

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे आणि वाचकप्रिय लेखक सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. भाऊ तोरसेकर यांनी 1964 ते 2014 या कालखंडातील देशाच्या राजकारणाचा राजकीय पट या पुस्तकाद्वारे उलगडून…

पुढे वाचा