तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नव्या दमाच्या प्रतिभावंत लेखकाचं आवर्जून वाचा,’ असं सांगणारे दिग्गज साहित्यक्षेत्रात दुर्दैवानं कमी झालेत. जे थोडेफार आहेत त्यांच्यामुळे हा साहित्यगाडा अव्याहतपणे सुरू आहे. अशाच गुणग्राहक लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक, विचारवंत डॉ. द. ता. भोसले. उमलत्या अंकुरांना बळ देण्यात भोसले सर कायम आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांनी लावलेली अनेक रोपटी आज फुला-फळांनी बहरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा मला एकदा फोन आला. ते म्हणाले, ‘‘संपादक महोदय, आमचा सोलापूर जिल्हा म्हणजे प्रतिभावंतांची खाणच आहे. काही कारणानं त्यातले काही अस्सल हिरे दुर्लक्षित राहिलेत.…

पुढे वाचा

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे आणि वाचकप्रिय लेखक सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. भाऊ तोरसेकर यांनी 1964 ते 2014 या कालखंडातील देशाच्या राजकारणाचा राजकीय पट या पुस्तकाद्वारे उलगडून…

पुढे वाचा

गुलाबी वर्तमानाचं वास्तव…

गुलाबी वर्तमानाचं वास्तव

काल कॉलेजच्या कॅपसमध्ये कुणीतरी पेरलं माझ्या न्हाल्या उरात चिमण्यांचे गुंंज… मी दिवसभर सजत राहिलो सुरात… भिजत राहिलो. आतल्या आत मनातल्या आभाळाच्या मिठीत… मी सहजपणे वावरातल्या फुलांंना अत्तराची स्वप्नंच बहाल केली… सारं काही स्वप्नातलं. तिचं मन… त्याचं मन… वार्‍यावर डोलत राहतं… हळूहळू कमी होतं दोन मनांचं.. दोन देहांचं एकमेकातलं अंंतर! मग काय…? आणाभाका हातात हात घेऊन… भविष्यकाळ एकमेकांच्या श्‍वासात श्‍वास सांडून निरंतर जगण्याचा… वयाच्या उमेदीने आणि एकमेकांबद्दल असणार्‍या आकर्षणातून जगण्याच्या वाटेवर बरंच काही घडून जातं… मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही…! तिही माझ्याशिवाय जगुच शकणार नाही.. हाच विचार घेऊन कॉलेजमधल्या चार भिंतीच्या…

पुढे वाचा