डॉ. उज्ज्वला हरपळे यांची नियुक्ती

डॉ. उज्ज्वला हरपळे यांची निवड

लोणी काळभोर, (प्रतिनिधी) : डॉ. उज्ज्वला हरपळे यांची महिला व बालविकास राष्ट्रीय सल्लागार समितीवर केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी नियुक्ती केली असून फुरसुंगी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना डॉ. हरपळे यांनी सांगितले की, समाजसेवेचा वसा सासरे एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्यापासुन मिळाला असून यापुढे तो तसाच चालू राहिल.

फुरसुंगी हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असेलेलं गाव. येथील एकनाथराव हरपळे गुरुजी यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांचे पुत्र डॉ. बाळासाहेब हरपळे आणि सूनबाई डॉ. उज्ज्वला यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. डॉ. हरपळे ऐश्‍वर्या फौंडेशनच्या अध्यक्षा, ई. एम.एच. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका, सूर्योदय शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत.

त्यांचे सासरे एकनाथराव गुरुजी यांच्यासोबत त्यांचे वडील कै. विजयकुमार रामचंद्र भगवान यांच्याकडून त्यांना समाजसेवेचे आणि देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वडील सैन्यदलात असताना दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले. दोन वर्षांनी त्यातून सावरल्यावर त्यांनी पुन्हा देशसेवा सुरू केली. हाच आदर्श गिरवत पती डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्या सहकार्याने त्यांनी सामाजिक कामांचा विडा उचलला. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या संतवचनाप्रमाणे त्यांनी सामान्य माणसाच्या भल्यासाठी विविध उपक्रम सशक्तपणे राबवले. त्यामुळेच त्यांची आज केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी महिला व बालकल्याण राष्ट्रीय सल्लागारपदी नियुक्ती केली असून त्यांची विजयाच्या दिशेने यशस्वी घौडदौड सुरू आहे.

डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी अतिशय प्रतिकुलतेतून, संघर्षातून वाटचाल केली आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुखदुःखाची जाण आणि सामाजिक भान या दाम्पत्याकडे उपजतच आहे. डॉ. बाळासाहेब प्रतिकुलतेतून शिकले, चित्रपट निर्माते झाले, रुग्णालय उभारले, बांधकाम व्यवसायात नवनवीन प्रयोग करत त्यांनी सामान्य माणसाला माफक दरात हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला. कुणाची शिक्षणाची समस्या असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांच्या आरोग्याची समस्या असेल डॉ. बाळासाहेब आणि डॉ. उज्ज्वलाताई हरपळे स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी आधी धावत येतात. नफ्या-तोट्याची पर्वा न करता गरजूंना मदत करणार्‍या या दाम्पत्याची म्हणूनच या परिसरात सुकीर्ती आहे.

सुरुवातीला डिंबेसारख्या वनवासी भागात त्यांनी वैद्यकीय सेवा केली. दरम्यान वडिलांच्या प्रेरणेने फुरसुंगी गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यास सुरूवात केली. 2000 साली स्वतःचे सुसज्ज हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह उभारल्यानंतर आजतागायत त्यांनी असंख्य आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत, शेंदरी येथील आदर्श महाविद्यालयाला 5 लाख रुपयांचा निधी, महापालिकेच्या पाणी व्यवस्थेसाठी 12 लाखांची मदत यातून त्यांचे दातृत्व सिद्ध होते. ‘स्वामी माझे दैवत’ हा कौंटुंबिक, अध्यात्मिक चित्रपटही त्यांनी काढला. पितांबर काळे, ऐश्‍वर्या नारकर, कुलदीप पवार, प्रेमा किरण अशा बड्या अभिनेत्यामुळे तो चित्रपट 29 आठवडे हाऊसफुल चालला. डॉक्टरांसाठी कार्यरत असलेल्या डॉ. बाळासाहेब यांना भारतीय जनता पक्षाने त्यांची भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली. ते भारत सरकारच्या रेल्वे सल्लागार समिती व दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे सदस्यही आहेत.

त्यांच्या प्रयत्नातून फुरसुंगीतील कचरा डेपो हलविण्यासाठी पक्षविरहीत आंदोलन छेडले गेले. ग्रामस्थांची वेळोवेळी मिळणारी साथ, सहकार्य यामुळेच हे काम उभे करू शकलो अशी कृतज्ञता ते नम्रपणे व्यक्त करतात. म्हणूनच त्यांना झेप गौरव, लोक कल्याण भूषण, विराट गौरव अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे रुग्णालय महामार्गावर असल्याने अनेक रुग्ण रात्री-अपरात्री त्यांच्याकडे येतात. त्यांच्यावर योग्य उपचार करून स्वतःच्या गाडीतून त्यांना घरापर्यंत पोहचविणारे डॉ. बाळासाहेब आणि डॉ. उज्ज्वलाताई हरपळे म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे आणि कौतुकास पात्र ठरतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सशक्त नेतृत्व देशाला मिळाल्याने हरपळे दाम्पत्याचा उत्साह बुलंद झाला आहे. त्यांनी रुग्णालयाबरोबरच पक्ष्यांसाठी अनाथालय निर्माण केले आहे. पतसंस्था, शाळा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून अनेक उपक्रम, कार्यक्रम तडीस नेणार्‍या उज्ज्वलाताई हरपळे यांची जिद्द आणि कर्तबगारी मोठी आहे. शासनाच्या अनेक योजना लोकोपयोगी असूनही सामान्य माणसापर्यंत त्या योजना प्रभावीपणे पोहचत नाहीत, अशी उज्ज्वलाताईची खंत आहे.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा