अब्रूदाराची आत्महत्या

अब्रूदाराची आत्महत्या

गाडीने वा अन्य कुठल्या मार्गाने तुम्ही पर्यटनाला गेलात तर देशाच्या कुठल्याही लहान-मोठ्या शहरात वा हायवेवर तुम्हाला एक आलिशान हॉट्रेल नक्कीच बघायला मिळालेले असणार. ‘कॅफे कॉफी डे’ असे त्याचे नाव आहे. देशात अशा अठराशे हॉटेलची साखळी आहे आणि तिथे एकाच पद्धतीची सजावट दिसेल व एकाच दर्जाचे खाद्यपेय पदार्थही मिळतात.

पुढे वाचा

पाकिस्तानचे राहुल गांधी

पाकिस्तानचे राहुल गांधी

मध्यंतरी दोन अडीच वर्षे निघून गेली हे सत्य आहे. दरम्यान कुलभूषण जाधव या भारतमातेच्या सुपुत्राला शारीरिक यातनाही सहन कराव्या लागल्या यात शंका नाही; पण अखेरीस आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानचे थोबाड ़फुटायचे राहिले नाही. आता त्याचा निकाल आल्यावर आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यातही आपलाच कसा विजय झाला आहे, ते सांगायला खुळा युक्तीवाद केलेला आहे.

पुढे वाचा

राजकारण 1971 च्या दिशेने…

राजकारण 1971 च्या दिशेने...

सत्य समोर असते पण ते बघायची व समजून घेण्याची हिंमत आपल्यामध्ये असावी लागते. इतिहासापासून आपण काही फारसे शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. गंमतीची गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणारे वा तो इतिहास शिकवणारेही त्यापासून स्वत: काही शिकत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. तसे नसते तर शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने राहुल गांधी यांच्या आरोपबाजीच्या मागे फरफटत जाण्याची अगतिकता दाखवली नसती. पंचवीस वर्षापूर्वी खुद्द शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईतल्या दंगलीनंतर त्यांना केंद्रातून माघारी राज्यात यावे लागलेले होते. त्यांचे स्वागत जिहादी प्रवृतीने बॉम्बस्फोटाची मालिका आठवड्याभरात घडवूनच केले होते पण म्हणून…

पुढे वाचा

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे आणि वाचकप्रिय लेखक सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. भाऊ तोरसेकर यांनी 1964 ते 2014 या कालखंडातील देशाच्या राजकारणाचा राजकीय पट या पुस्तकाद्वारे उलगडून…

पुढे वाचा

‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’

परखड बाण्याचे सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय भाष्यकार भाऊ तोरसेकर यांचे ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक मराठी भाषा दिनानिमित्त (बुधवार, दि. 27 फेब्रुवारी 2019) मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांचे मनोगत खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी! गेल्या म्हणजे 2014 च्या सोळाव्या लोकसभा मतदानात आधीचा पायंडा मोडून मतदाराने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला एकपक्षीय बहुमत बहाल केले. इतकेच नाहीतर दीर्घकाळ देशात सलग राज्य करणार्‍या कॉग्रेस पक्ष वा त्यावर मालकी हक्क असलेल्या नेहरू गांधी खानदानाला पराभूत केले. त्याचे आकलन आजही बहुतांश राजकीय अभ्यासक, विश्‍लेषकांना होऊ शकलेले नाही; कारण मागल्या अर्धशतकातील अधांतर…

पुढे वाचा

आपण काही करू शकतो?

आपण काही करू शकतो?

Anyone who doesn’t take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either. – Albert Einstein बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ्यावर फिदायीन म्हणजे आत्मघाती जिहादीने स्फोटकाने भरलेली गाडी आदळून 40 जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता उठलो, तेव्हा चहा घेताना हाती दैनिक ‘लोकसता’ होता. पुलवाम्यात घडलेल्या भयंकर घटनेची बातमी वाचली आणि सकाळचे विधी उरकले. अंधोळ नाश्ता झाल्यावर त्या…

पुढे वाचा