माध्यमांतराचा रंजक धांडोळा

माध्यमांतराचा रंजक धांडोळा

आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्याच्या मनातील सुप्त भावनांना अंकुर फोडणं आणि काहीवेळा त्याला खतपाणी घालणं हे सर्वकाही एखाद्या अव्वल साहित्यकृतीतून घडू शकतं. असं साहित्यच काळाच्या ओघात…

पुढे वाचा

तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नव्या दमाच्या प्रतिभावंत लेखकाचं आवर्जून वाचा,’ असं सांगणारे दिग्गज साहित्यक्षेत्रात दुर्दैवानं कमी झालेत. जे थोडेफार आहेत त्यांच्यामुळे हा साहित्यगाडा अव्याहतपणे सुरू आहे. अशाच गुणग्राहक लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक, विचारवंत डॉ. द. ता. भोसले. उमलत्या अंकुरांना बळ देण्यात भोसले सर कायम आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांनी लावलेली अनेक रोपटी आज फुला-फळांनी बहरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा मला एकदा फोन आला. ते म्हणाले, ‘‘संपादक महोदय, आमचा सोलापूर जिल्हा म्हणजे प्रतिभावंतांची खाणच आहे. काही कारणानं त्यातले काही अस्सल हिरे दुर्लक्षित राहिलेत.…

पुढे वाचा