अत्रेंनी पाडलेला मुंबईचा बादशहा

‘हा सदोबा… लोकसभेत जायचं म्हणतोय. याला मी शोकसभेत पाठवेन,’ अशी बोचरी टीका करणार्‍या आचार्य अत्रे यांनी एका सभेत एक विधान केलं होतं. ते म्हणाले, ‘मी 13 ऑगस्टला जन्माला आलो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’ ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या स. का. पाटील यांच्या विरूद्ध आचार्य अत्रे यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्याचं कारण होतं, स. का. पाटील यांचा संयुक्त महाराष्ट्राला असलेला विरोध. त्यामुळंच 1967 च्या लोकसभा निवडणुकीत साऊथ बॉम्बे मतदारसंघातून पाटील…

पुढे वाचा