माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे

पुढे वाचा

जिजाऊ

कसे व्हावे संगोपण कसे पुत्र घडवावे जेव्हा प्रश्न हे पडती उल्लेख फक्त तिचा! तिचे दिव्य ते संस्कार झाला शिवबा साकार जशी दैवी ती कुंभार अशी राजमाता जिजा!

पुढे वाचा