माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा
लेक साखर पाडवा
माय प्रेमाचा निर्झर
लेक आनंदी पाझर
माय कष्टाची भाकर
लेक लाडाची कदर
माय सुंदर आभाळ
लेक नितळ निर्मळ
माय अंगणी तुळस
लेक घराची कळस
माय प्रेमाचा सागर
लेक कुळाचा जागर
माय वाढता मांडव
लेक नात्यांचा सांकव
माय गोकूळ आरसा
लेक वंशाचा वारसा
माय सुखाचा आगर
लेक दुःखाला झालर

-राजेंद्र दिघे

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा