पर्मनंट माजी मुख्यमंत्री

इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्‍याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण चुकून त्यांनी बाबासाहेब भोसले यांचं नाव पुढे केलं असं सांगितलं जातं. मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांचं नाव जाहीर होताच त्यांचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसला नव्हता.…

पुढे वाचा

‘निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच’

होय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना हिंदू महासभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभे करत सहकार्य केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांच्या विरोधात त्यांचेच पी.ए. नारायण एस. काजरोळकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून निवडून आले. काजरोळकर यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे एका दूध विक्रेत्याने त्यांचा पराभव केला अशी चर्चा त्या काळात होती. या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेवर गेले. लोकसभेत जाण्याचं…

पुढे वाचा