सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी बालगोपालांसाठी लिहिलेली तब्बल बारा पुस्तके मुंबईच्या ‘सम्राट प्रकाशन’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे बच्चे कंपनीचे भरपूर मनोरंजन तर होणारच आहे शिवाय त्यातून मोलाचा संदेश दिलेला असल्याने त्यांचे प्रबोधनही होणार आहे. या गोष्टींच्या माध्यमातून लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांनी विविध विषयांमार्फत, जीवन जगताना आपण जागरूक कसं रहावं यावरही मार्मिक भाष्य केलं आहे. सर्वच पुस्तकांमध्ये कथेला अनुसरून सुबक व आकर्षक चित्रांची मनोवेधक मांडणी केली असल्याने त्यातील गोष्टी वाचताना वाचक या पुस्तकांच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही हे निश्चित! ‘मजेदार कथा’ या पुस्तकात एकूण सात छोट्या…
पुढे वाचाTag: साप्ताहिक चपराक १८-२४ फेब्रुवारी २०१९
साप्ताहिक चपराकचा १८ फेब्रुवारी – २४ फेब्रुवारी २०१९ अंक
नीतांजली – प्रेमदिनाचे चिंतन!
प्रेमाचा दिवस! कल्पना मोठी छान आहे, पण मग फक्त एक दिवसच प्रेमाचा असतो का? आणि बाकी सारे दिवस ते कशासाठी? 14 फेब्रुवारी साजरा करणे, त्यानिमित्त फुले भेटी, मनीचे भाव व्यक्त करणे याला विरोध करावा किंवा व्हावा असं मला अजिबात वाटत नाही! पण फक्त एक दिवस प्रेमाचे गोडवे गावे अन् मग सारेच विसरुन जावे, हे कुठेतरी टोचतं. पाश्चात्यांची परंपरा म्हणून घ्यावं की… की घेऊ नये? हा ज्यांचा त्याचा प्रश्न! पण प्रेमाची नाती आणि त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मात्र आयुष्यभर जपावा. हे हा दिवस अधोरेखीत करतो असं मला वाटतं. प्रेम ही एकदिवसीय…
पुढे वाचापुलवामा -विनम्र अभिवादन
14 फेब्रुवारी. साधारण दुपारची वेळ. सी. आर. पी. एफ.च्या ताफ्यावर एक अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असा आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात भारतीय सैन्याचे 44 जवान शहीद झाले. बातमी सोशल मीडियावर वार्याच्या वेगाने पसरली. दृश्ये तर काळजाचा थरकाप उडवणारी होती. मन सुन्न करणारी घटना! देश सूडाच्या भावनेने पेटून उठलाय, सर्वांना उत्तर हवंय. सूड घ्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करा अशा संतप्त प्रतिक्रियांनी जोर धरलाय. पण त्याने प्रश्न खरेच सुटतील का? आम्ही आज सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना पुन्हा एकदा कंठस्नान घालू, उद्या पुन्हा नवीन संघटना, नवीन संघ तयार होतील आणि पुन्हा नवीन…
पुढे वाचाओशोवाणी – गोरख म्हणतो – माणूस देव आहेच…
सृष्टीत एकही पाण्याचा थेंब असा नाही की जो आज ना उद्या समुद्राला मिळणार नाही. अपूर्ण पूर्ण होतं, थेंब समुद्र होतो तसाच मनुष्यही परमेश्वर होतो. तोच त्याचा स्वभाव आहे. फक्त बंधन सोडण्याची गरज आहे. तेवढाच अडथळा आहे. माणसाच्या देव होण्यात काहीच अडचण नाही. आम्हीच स्वतःच्या भोवताली एक लक्ष्मणरेषा आखून ठेवली आहे. आम्हीच तिच्याबाहेर पाऊल टाकत नाही. आम्हीच भिंती उभारल्या आहेत. ज्ञात गोष्टीतच आम्ही स्वतःला जखडून ठेवलंय. अज्ञात सतत हाकारतंय पण फक्त भीती वाटण्यामुळं आम्ही यात्रेवर निघतच नाही. योग ही अज्ञाताची यात्रा आहे पण जो जाणण्यामुळे दमला आहे तोच अज्ञाताच्या यात्रेला निघतो.…
पुढे वाचाप्रवास चंद्रपूरचा
साधारण 1989-1994 ह्या पाच वर्षांचा तो काळ! काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला. एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल-परवा घडल्याप्रमाणे एकेका प्रसंगाची आठवण करून देत होता. खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते. 1989 साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनीमध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो. मी रहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला. त्यात कंपनीची बस नव्हती आणि येण्याजाण्याची सोय आपली आपण करायची…
पुढे वाचाआपण काही करू शकतो?
Anyone who doesn’t take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either. – Albert Einstein बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ्यावर फिदायीन म्हणजे आत्मघाती जिहादीने स्फोटकाने भरलेली गाडी आदळून 40 जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता उठलो, तेव्हा चहा घेताना हाती दैनिक ‘लोकसता’ होता. पुलवाम्यात घडलेल्या भयंकर घटनेची बातमी वाचली आणि सकाळचे विधी उरकले. अंधोळ नाश्ता झाल्यावर त्या…
पुढे वाचा