पाकिस्तानचे राहुल गांधी

पाकिस्तानचे राहुल गांधी

मध्यंतरी दोन अडीच वर्षे निघून गेली हे सत्य आहे. दरम्यान कुलभूषण जाधव या भारतमातेच्या सुपुत्राला शारीरिक यातनाही सहन कराव्या लागल्या यात शंका नाही; पण अखेरीस आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानचे थोबाड ़फुटायचे राहिले नाही. आता त्याचा निकाल आल्यावर आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यातही आपलाच कसा विजय झाला आहे, ते सांगायला खुळा युक्तीवाद केलेला आहे.

पुढे वाचा

कुलभूषण जाधव खरेच हेर आहे काय?

कुलभूषण जाधवमुळे ‘भारतीय हेरगिरी’ हा चर्चेचा विषय बनली आहे. कुलभूषणला पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीयांनी कुलभूषणला परत आणण्याची मागणी जोरात सुरु केली आहे. भारत सरकारनेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. कुलभूषणला फाशी दिली तर तो पूर्वनियोजित खून ठरेल असेही भारताने सुनावले आहे. या सर्व प्रकरणाचे विश्‍लेषण आपण करुच, पण मुळात कुलभूषण जाधव हेर होता की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपल्याला गुप्तहेर माहीत असतात ते चित्रपट व कादंबर्‍यातून! त्यातील त्यांची साहसे, जीवघेणी कारस्थाने, सनसनाटी मारामार्‍या, श्‍वास रोखून धरायला लावणारे पाठलाग,  ते वापरत असलेली अत्याधुनिक साधने…

पुढे वाचा