आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

– प्रवीण दवणे ‘चपराक दिवाळी विशेषांक 2013’ एका हाताच्या अंतरावर असणारी प्रसारमाध्यमे अगदी मघाचच्या सेकंदाला घडलेली बातमी देत असोत; अजूनही कोट्यवधी घरं सकाळच्या एका बेलची किंवा हळूच वाजणार्‍या कडीची वाट पाहत असतात. एक उबदार घडी, कडीत वाट पाहत असते आपली; अन् आपण त्या ‘घडी’ची! वृत्तपत्रात बातमी वाचल्यावाचून तिचं ‘बातमीतपण’ मुळी जाणवत नाही. मथळ्यांमधून उतरत जाणारी न् वेगळी असेल तर चहाच्या एक घोट घेऊन घरातल्या कुणालातरी वाचून दाखवल्यावाचून ‘बातमी’ पूर्ण होत नाही; हे निर्विवाद सत्य आहे.

पुढे वाचा