marathi kavita

होता आलं पाहिजे झाड

Share this post on:

माणसाला होता आलं पाहिजे झाड,
त्याला उगवता आलं पाहिजे,
प्रस्तराच्या नाभीतून…
आणि सताड झेपावत आकाशात,
पसरवता आल्या पाहिजे फांद्या…
त्याला डोलता आलं पाहिजे,
वाहणार्‍या वार्‍यासोबत,
त्याला बोलता आलं पाहिजे,
बरसणार्‍या धारांसोबत…
तो हसत राहावा,
हिवातील दवबिंदूंच्या कणांतून
नि रापत्या उन्हातून…
त्याला सहता यावीत सारेच ऋतुरंग,
गाळून शिशिरात पाने,
वसंतात पुन्हा बहरावे…
…खोडाने उभे असावे कणखर,
मुळांनी शोधत ओल,
रुतावे मातीत खोल खोल…

-राम बागडे
गोंदिया.
7798159213

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

7 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!