माझी आई

आई म्हणजे आठवण
कधीच न सरणारी
शाळेत असलो तरी
सतत आठवणारी

आई म्हणजे अजब रसायन
धपाटे तिचे
मला वळण लावणारे
लागलं कुठे काही तर
डोळे तिचे नकळत
माझ्यासाठी रडणारे

आई…
नाही फक्त एक साद
ती म्हणजे माझे आयुष्य
तिने दिलेला आशीर्वाद अन् बोल
घडवतात माझे भविष्य

म्हणते आई
मी आहे तिचा लाडका बाळ
पण खरं सांगू का?
माझ्यासाठी ती आहे
मायेचं पांघरूण अन्
परतीचं आभाळ!

– स्नेहा कोळगे

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा