आकाशझेप – चित्रदर्शी शौर्यगाथा | Aakashzep – A Vivid Saga of Valor

Share this post on:
एखाद्या अद्भूतरम्य कादंबरीपेक्षाही थराराक, रोमांचकारी आणि प्रेरणादायी असे कुणाचे आत्मकथन असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून एका पुस्तकाचे नाव सांगता येईल. ज्यांच्या घरातच देशप्रेम आणि शौर्याच्या संस्कारांची परंपरा आहे अशा एअरमार्शल भूषण गोखले आणि सौ. मेघना गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘आकाशझेप’. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना खर्‍याअर्थी आकाशक्षेप घेणार्‍या एका साहसी सेनापतीची ही शौर्यगाथा आहे. पती आणि पत्नीने एकत्र येऊन आपले समृद्ध जीवनानुभव अत्यंत चित्रदर्शी शैलीत पुस्तकाच्या माध्यमातून नोंदविण्याचे बहुधा हे पहिलेच उदाहरण असावे.
‘बिंगो’ या टोपणनावाने सुपरिचित असलेल्या भूषणजींचे केवळ त्यांच्या बी. एन. गोखले या नावावरून हे टोपणनाव पडले नाही तर या नावाला वैमानिक क्षेत्रात अनेक अर्थच्छटा आहेत. त्याविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. आपल्या झुंजार वडिलांच्या आठवणी जागवताना आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’च्या तीन अंकात ‘सत्यसृष्टीतला झुंजार डिटेक्टिव्ह’ ही लेखमाला लिहिल्याचे ते समप्रमाण आणि गौरवाने सांगतात. ज्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या श्वासाश्वासात देशसेवाच आहे अशा गोखले दाम्पत्याने लिहिलेल्या या पुस्तकातून जाज्ज्वल्य देशाभिमानाची प्रचिती येते.
ग्लायडिंगच्या एका अनुभवानंतर खट्टु झाल्यावर फ्लाइट लेफ्टनंट मेनेझीस भूषणजींना म्हणतात, ‘‘बिंगो, मला माहीत आहे, भविष्यात तू खूप उंच उंच भरारी घेणार आहेस! पण एक लक्षात ठेव, जे वर जाते त्याला खाली यावेच लागते. म्हणूनच कितीही उंच उडालास तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले पाहिजेत…’’
भूषणजी ही आठवण जागवून लिहितात, ‘त्यांचे बोलणे ऐकून माझी नाराजी कुठल्या कुठे पळून गेली. जीवनामध्ये उंचच उंच भरारी घेण्याचा निर्धार त्यावेळी कायम झाला आणि जीवनात अहंकाराला कधीही बळी न पडण्याचादेखील.. आपण कितीही मोठे झालो, गगनाला गवसणी घातली तरी समाजाचे ऋण लक्षात ठेवायचे, शक्य तितकी समाजसेवा करायची, देशसेवा करायची हे तत्त्व मनाशी नक्की झाले.’ हाच मंत्र त्यांनी आजतागायत जपल्याचे त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरून दिसून येते.
वायूदलाविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रचंड औत्सुक्य, जिज्ञासा असते. अशा वायूसेनेचे उपप्रमुख होण्यापर्यंत ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली असेल त्यांचे आयुष्य किती थरारक आणि रोमांचकारी असेल? या पुस्तकातील पानापानातून ते दिसून येते आणि आपण थक्क होतो. मुख्य म्हणजे भूषणजी आणि मेघनाताईंनी या पुस्तकात जी लेखनशैली वापरली आहे त्यात कुठेही तांत्रिकपणा किंवा रूक्षपणा नाही. या सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, इतके वास्तवदर्शी चित्र त्यांनी त्यांच्या विलक्षण शब्दसामर्थ्याने उभे केले आहे. याच्या जोडीलाच भरपूर छायाचित्रे, रेखाटने, आकृत्या आणि क्यु आर कोड स्कॅनर दिल्याने निर्मितीमूल्याच्या दृष्टिनेही पुस्तकाने आकाशझेप घेतली आहे.
बागडोगरा येथे असताना फ्लाईंग ऑफिसर विजय राजन या आपल्या सहकारी मित्राच्या झालेल्या अपघाती मृत्युचे वर्णन त्यांनी केले आहे. विमानातून इजेक्ट करताना पॅराशूट सोडतेवेळी उंचीचा, हवेचा अंदाज चुकल्याने पाण्यात न पडता ते नदीच्या काठावर पडले आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. असे प्रसंग वाचताना ही मंडळी त्यांच्या प्राणाची बाजी लावून देशसेवेसाठी जे बलिदान देतात त्याची जाणीव होते आणि वाचक अंमर्मुख होतात.
1971 सालच्या बांग्लादेश युद्धातील ऐतिहासिक विजय, युद्धानंतर फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूल कोर्ससाठी झालेली निवड, तिथले प्रशिक्षण आणि अनुभव हे सारे मुळातच वाचण्यासारखे आहे. एफआयएसमध्ये पहिले आल्यानंतर ‘फ्लाइंगचे स्वप्न पाहणारा पहिला माणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रीक पुराणकथेतील ‘इकॅरस’ या कारागिराचा पुतळा असलेली ट्रॉफी त्यांना मिळाली. त्यानंतर 1973 साली नव्यानेच सुरू झालेल्या हैदराबादजवळील दुंडिगल येथील एअर फोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये त्यांची पोस्टिंग झाली. तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवतानाच्या अनुभवाविषयी ते लिहितात, ‘विद्यार्थ्यांना शिकवताना बारीकसारीक चुका कशा होऊ शकतात, हे समजावून सांगणे आणि ते सुद्धा स्वतःवर संयम ठेवून, शांतपणे सांगण्याचे आव्हान असते. विद्यार्थ्याला सक्षम बनविण्याची प्रक्रिया करताना प्रशिक्षकाला जर विद्यार्थ्याकडून चूक होत असेल तर कुठल्या क्षणाला स्वतःकडे विमानाचे नियंत्रण घ्यायचे, तो क्षण निवडणे ही तारेवरची कसरत असते. विद्यार्थी त्या चुकीतून योग्य तो मार्ग काढून आणि प्रसंगावधान राखून जर परत अचूक फ्लाइंग करू शकला तर तुम्ही दिलेले प्रशिक्षण योग्य ठरते आणि जर विद्यार्थ्याच्या प्रत्येक चुकीनंतर इन्स्ट्रक्टर स्वतःकडे नियंत्रण घेऊ लागला तर विद्यार्थी एकटा कधीच फ्लाइंग करण्यास सक्षम होत नाही.’ हे निरीक्षण महत्त्वाचे तर आहेच पण अनेक क्षेत्रासाठी ते तंतोतंत लागू पडते.
‘एअरफोर्स हे माझे पहिले प्रेम आहे. माझे ध्येय हाच माझा ध्यास आहे. त्यामुळे स्नेहलता (लग्नाच्या आधीचे नाव) म्हणजे माझे दुसरे प्रेम असेल’ असे त्याकाळी धाडसाने सांगून ‘शुभमंगल’ करणार्‍या भूषणजींनी या प्रकरणाला ‘माय सेकंड लव्ह’ असेच म्हटले आहे. या प्रकरणापासून मेघनाताईंनी त्यांचे अनुभव मांडले असून त्याला त्यांनी ‘माय फर्स्ट लव्ह’ असे यथोचित शीर्षक दिले आहे. या पुस्तकात इटॅलिक स्वरूपात (तिरकी अक्षरे) जो मजकूर आहे तो सहलेखिका म्हणून मेघनाताईंनी लिहिला आहे.
1971च्या युद्धाच्या वेळी बांगलादेशातील ‘मेघना’ नदीला ओलांडून जाणार्‍या शत्रूंचा गोखले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी निःपात केला होता. म्हणून त्यांनी स्नेहलता यांचे नाव लग्नानंतर बदलून मेघना असे ठेवले. लग्नात गोखले यांनी घास भरवताना उखाण्याऐवजी ‘तेरे मेरे सपने, अब एक रंग है’ हे गाणे म्हटले. देशप्रेमाने भारावलेल्या भूषण आणि मेघना गोखले यांनी या पुस्तकाद्वारे त्यांच्या खडतर जीवनप्रवासाबरोबरच त्याकाळचा असा अनोखा इतिहासही वेगळ्या ढंगात शब्दबद्ध केला आहे.
जीवनात सत्याची कास धरणे किती महत्त्चाचे असते हे ‘मृत्युचा निसटचा स्पर्श’ या प्रकरणात सांगताना गोखले लिहितात, ‘आयुष्यामध्ये कधीही खोटे बोलून, आपली जबाबदारी, चूक मान्य न करता दुसर्‍याच्या अंगावर ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण एक ना एक दिवस हे सत्य बाहेर येतेच. खोटे बोलून तुम्ही तात्कालिक फायदा करून घेऊ शकाल मात्र त्याचा कायमस्वरूपी लाभ होऊ शकणार नाही.’
वैमानिकाची पत्नी होणे म्हणजे कोणत्या दिव्यातून जावे लागते हे मेघनाताईंनी अनेक उदाहरणाद्वारे लिहिले आहे. ‘जीवनात कोणतीही परिस्थिती आली, कितीही अडचणी आल्या तरी मी सदैव साथ देईन, बरोबर असेन. पुढे जे काही होईल त्याला आपण मिळून तोंड देऊ,’ असे धीरोदात्तपणे सांगत प्रत्येक अडचणीच्या काळात मेघनाताईंनी भूषणजींची खंबीर पाठराखण केली आहे. पतीपत्नीच्या नात्यातील हाच विश्वास ही समर्थ साथ हेच तर आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या पुस्तकातून ते वेळोवेळी अधोरेखित होते.
इराकमधील वास्तव्य, मुक्काम पोस्ट हिंडन आणि भटिंडा, वेलिंस्टन स्टाफ कॉलेज कोर्स, 221 स्कॉड्रनचे नेतृत्व ही प्रकरणेही वाचनीय आहेत. अमेरिकेतील 1991-92चे एअर वॉर, इजिप्तमधील तीन वर्षे, ऑपरेशन पराक्रम अशी प्रकरणे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. वायुसेना उपप्रमुख ही तर प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे. या पुस्तकात हे सगळं वाचताना स्वाभाविकपणे आपल्या मनातही देशप्रेमाचे अनोखे स्फुल्लिंग चेतते. देशसेवा करतानाचे अनुभव, कौटुंबिक आठवणी आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य अशा सगळ्या आघाड्यांवरील अनुभवकथन ओघवत्या आणि चित्रदर्शी शैलीत केल्याने या लढवय्या सेनानीचा इतिहास प्रभावी शैलीत शब्दबद्ध झाला आहे.
लेखक – एअरमार्शल भूषण आणि मेघना गोखले
प्रकाशक – उत्कर्ष प्रकाशन, पुणे 020 25537958
पाने – 360, मूल्य – 600/-
– घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी – दै. सकाळ ‘सप्तरंग’ २०-०४-२०२५
English Translation

Aakashzep – A Vivid Saga of Valor

Could a real-life story be more thrilling and inspiring than even the most imaginative fantasy? The book ‘Aakashzep’ (meaning ‘Sky Leap’) strongly suggests it can. Written by Air Marshal Bhushan Gokhale and his wife, Meghna Gokhale, whose family has deep roots in patriotism and bravery, this book unveils the extraordinary life of a courageous leader who truly soared through the skies while serving India. It’s a special collaboration, a husband and wife sharing their rich life experiences in such a vivid way that readers feel completely immersed in their journey.

Bhushanji, affectionately known as ‘Bingo,’ earned this nickname for more than just his initials, B. N. Gokhale. As he explains in the book, it carries special significance within the world of aviation. He fondly remembers his valiant father and proudly recounts how the renowned writer Acharya Atre dedicated a compelling three-part series in the ‘Navyug’ newspaper to his father’s remarkable character. The Gokhales, a family whose very essence is intertwined with service to India, have crafted a book that radiates an unwavering sense of national pride.

A particularly touching moment recounts a time when Bhushanji felt disheartened after a gliding experience. Flight Lieutenant Menezes offered some insightful advice: “Bingo, I know you’re destined for great heights! But never forget, what goes up must come down. So, no matter how high you fly, always keep your feet firmly planted on the ground.”

Bhushanji reflects that these words instantly lifted his spirits. It was then he made a firm resolve to aim for the highest achievements in life while steadfastly avoiding arrogance. The principle of always remembering his responsibility to society, serving it whenever possible, and dedicating himself to the nation, regardless of his success, became deeply ingrained in his being. His remarkable life journey serves as a powerful testament to his unwavering commitment to this principle.

The Indian Air Force holds a unique fascination for many. Imagine the exhilarating life of someone who ascended to the esteemed position of Vice Chief of the Air Staff! ‘Aakashzep’ vividly portrays this thrilling trajectory, leaving readers in profound admiration. What’s particularly captivating is Bhushanji and Meghnatai’s accessible writing style, free of complex technical terms. Their powerful narrative paints such a realistic picture that the events unfold seamlessly before the reader’s eyes. Furthermore, the inclusion of numerous photographs, sketches, diagrams, and even QR codes significantly enhances the book’s appeal and value.

The narrative poignantly recounts the tragic accidental death of Flying Officer Vijay Rajan, a close colleague of Bhushanji’s in Bagdogra. During an emergency ejection from his aircraft, a fatal misjudgment of altitude and wind direction led him to land on the riverbank instead of in the water, resulting in fatal internal injuries. Such episodes starkly underscore the ultimate sacrifices these brave individuals make for the nation, often at the cost of their lives, leaving a lasting and profound impact on the reader.

The book vividly recounts the historic victory of the 1971 Bangladesh War. Following this, it details Bhushanji’s selection for a rigorous Flying Instructors School Course, offering compelling insights into the training and experiences he underwent. His exceptional performance on the course earned him the prestigious ‘Icarus’ trophy, named after the mythical Greek craftsman who dared to dream of flight. In 1973, he was posted to the newly established Air Force Academy near Hyderabad. Reflecting on his experiences teaching aspiring pilots, he observes the delicate art of explaining potential errors with patience and self-control. He emphasizes the critical decision an instructor faces: choosing the precise moment to intervene when a student makes a mistake. If the student learns from it and recovers effectively, the training proves successful. However, premature intervention can hinder a student’s ability to develop independent flying skills. This insightful observation resonates far beyond the realm of aviation.

‘The Air Force is my first love. My ambition is my obsession. Therefore, Snehalata (my pre-marriage name) will be my second love,’ Bhushanji declared with endearing boldness before their wedding, aptly titling this chapter ‘My Second Love.’ Subsequently, Meghnatai takes over the narrative, offering her unique perspective in a chapter fittingly titled ‘My First Love.’ The italicized sections throughout the book represent Meghnatai’s valuable co-authored contributions.

The 1971 war witnessed Gokhale and his fellow soldiers bravely repelling enemy forces attempting to cross the ‘Meghna’ river in Bangladesh. This pivotal event served as the inspiration for him to rename Snehalata as Meghna after their marriage. At their wedding ceremony, instead of reciting a traditional Marathi ‘ukhana,’ Gokhale serenaded his bride with the Hindi song, ‘Tere Mere Sapne, Ab Ek Rang Hai’ (Our Dreams Are Now of One Color). United by a deep and shared love for their country, Bhushan and Meghna Gokhale, through this book, not only recount their challenging life journey but also vividly capture a unique and significant period in history.

In a chapter titled ‘Mrutyucha Nisatcha Sparsh’ (A Narrow Escape from Death), Gokhale powerfully underscores the fundamental importance of truthfulness: ‘Never attempt to advance in life by resorting to lies, evading responsibility for your mistakes, or shifting blame onto others, for truth has an inevitable and often revealing way of surfacing. While falsehoods might offer temporary gains, they can never provide lasting benefits or genuine fulfilment.’

Meghnatai eloquently portrays the unique trials and tribulations of being an airman’s wife through numerous personal anecdotes. Her unwavering support shines through in her resolute words during challenging times: ‘Whatever life throws our way, no matter the difficulties, I will always stand by you, I will be there. We will face whatever lies ahead together.’ This steadfast faith and deep companionship within their marriage beautifully exemplify the core values of cherished Indian culture, a powerful theme that resonates throughout the book.

The chapters detailing their time in Iraq, their various postings including Mukam Post Hindon and Bhatinda, the insightful Wellington Staff College Course, and Bhushanji’s leadership of the 221 Squadron offer compelling reading. Furthermore, chapters on the 1991-92 Air War in America, their three years in Egypt, and the significant Operation Parakram transport readers to diverse and fascinating settings. The culmination of his distinguished career as the Vice Chief of the Air Staff is a matter of immense national pride. Reading about these remarkable experiences naturally ignites a profound sense of patriotism within us. The seamless and vivid narration of his service experiences, intertwined with personal family memories and reflections on post-retirement life, effectively immortalizes the inspiring legacy of this valiant warrior in words.

Authors – Air Marshal Bhushan and Meghna Gokhale Publisher – Utkarsh Prakashan, Pune 020 25537958 Pages – 360, Price – ₹ 600/-

  • Ghanshyam Patil 7057292092

Published in – Daily Sakal ‘Saptarang’ 20-04-2025

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

11 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!