माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे

पुढे वाचा

गझलसम्राट सुरेश भट – नागेश सू. शेवाळकर

अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकामासोबत सामाजिक कामांचा छंद जोपासला होता. शांताबाईंच्या कविता वाचनाच्या छंदातून सुरेशला लहानपणापासूनच काव्याविषयी आवड निर्माण झाली.

पुढे वाचा

सरीवर सरी – श्रद्धा बेलसरे-खारकर

सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी’, ‘आजकाल’ आणि ‘फाईल व इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली’ हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल’ हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी’, ‘पद्मश्री विखे पाटील’, दूरदर्शनचा ‘हिरकणी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे अनुभवांचे संचित मोठे आहे.…

पुढे वाचा