कडू पण गुणकारी औषध #balkatha – हर्षल कोठावदे

Share this post on:

राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे…
रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आईच्या आग्रहास्तव आईचे म्हणणे त्याला ऐकावे लागे.

याउलट परिस्थिती शामची असते. शामने जसा हट्ट केला तसा आई त्याचा हट्ट पूर्ण करते. ‘मला अभ्यास करायचा नाही, मला कंटाळा आला आहे.’ शामने म्हटल्यावर आई म्हणायची, ‘ठीक आहे नंतर कर.’
शामने जेवणात स्नॅक्स मागितले तरी लगेच पुरवायची. नेहमी डब्याला बेकरीचे पदार्थ देत असे. राम नेहमी शामला म्हणत असे, ‘तुझी आई किती चांगली आहे, तू जसं म्हणतोस तसं ती वागते.’ यामुळे राम नेहमी दुःखी असायचा.
इकडे मात्र सततच्या बाहेरच्या खाण्यामुळे शाम काही दिवस आजारी पडला. आपसूकच त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परीक्षेचा काळ आला, दोन्ही मित्रांनी परीक्षा दिली. राम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, शाम मात्र काठावर पास झाला.

https://shop.chaprak.com/product/mitrachi-gosht/

दिवसागणिक, वर्षागणिक अशा परिस्थितीत ते मोठे होत गेले. पुढे राम एक चांगला आदर्श नागरिक व आदर्श अधिकारी झाला तेव्हा त्याला आपल्या आईची किंमत समजली. शाम मात्र एक साधारण मनुष्य म्हणून जीवन व्यतीत करू लागला.
काही वर्षानंतर दोन्ही मित्रांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी शामने मात्र रामचे व रामच्या आईचे कौतुक केले. माझ्या आईने जर मला योग्य वेळी हट्ट न पुरविता फटकारले असते तर मी नक्कीच तुझ्यासारखा मोठा झालो असतो. त्यावर राम एकच वाक्य बोलला, ‘औषध नेहमी कडू असते परंतु गुणकारी असते.’

हर्षल कोठावदे
नाशिक
99218 70820

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!