कसे व्हावे संगोपण कसे पुत्र घडवावे
जेव्हा प्रश्न हे पडती उल्लेख फक्त तिचा!
तिचे दिव्य ते संस्कार झाला शिवबा साकार
जशी दैवी ती कुंभार अशी राजमाता जिजा!
तव ज्ञानाच्या इंधनी झाला ज्योतीचा तो सूर्य
वनवासच जीवनी पण अखंड ते धैर्य
नर नारायण जन्मे माता पुत्राच्या रूपाने
एक बनते सारथी एक गाजवतो शौर्य
रोखण्यास तो अधर्म तूच जागवला धर्म
किती महान ते कर्म किती जिद्द अविभाज्य
हर लढ्या देई बळ तुझ्या मायेची ओंजळ
तुझं स्वप्नच आगळं ‘सर्वांसाठीचं स्वराज्य!’
छत्रपतींची जननी थोर संस्कारांची धनी
उभे राष्ट्र तुझे ऋणी आज जन्मदिनी तुझ्या
आज धन्य तो दिवस डोळा लागलिया आस
पुन्हा देण्या तो प्रकाश ये गं परतून जिजा
– ज्योती घनश्याम पाटील
e-mail : jyotibonge46@gmail.com