सावरकरांची कविता: आत्मबल -सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या लेखनातून व आजवर वाचलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक लेखातून, पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची प्रखर देशभक्ती, ओजस्वी बुद्धिमत्ता, त्यांची काव्यप्रतिभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ‘आत्मबल’ होय. या आत्मबलाच्या जोरावरच तर ते मार्सेलिसच्या समुद्रात जहाजाच्या हातभर रुंद खिडकीतून 20 फूट उंचावरून अथांग समुद्रात उडी टाकू शकले होते व याच आत्मबलाच्या जोरावर अंदमानासारख्या ठिकाणी एका अंधार्‍या कोठडीत, अनन्वित शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करू शकले होते. ‘आत्मबल’ या त्यांच्याच कवितेत त्यांनी मृत्युला केलेले एक भीषण आव्हान आहे व तेही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या वृत्तीमुळे.काय असेल त्या वेळी त्यांची गलबलवणारी…

पुढे वाचा