बालवाचकांसाठी सुंदर पर्वणी

बालवाचकांसाठी सुंदर पर्वणी-सुभाषचंद्र वैष्णव यांची नवी बारा पुस्तके

सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी बालगोपालांसाठी लिहिलेली तब्बल बारा पुस्तके मुंबईच्या ‘सम्राट प्रकाशन’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे बच्चे कंपनीचे भरपूर मनोरंजन तर होणारच आहे शिवाय त्यातून मोलाचा संदेश दिलेला असल्याने त्यांचे प्रबोधनही होणार आहे. या गोष्टींच्या माध्यमातून लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांनी विविध विषयांमार्फत, जीवन जगताना आपण जागरूक कसं रहावं यावरही मार्मिक भाष्य केलं आहे. सर्वच पुस्तकांमध्ये कथेला अनुसरून सुबक व आकर्षक चित्रांची मनोवेधक मांडणी केली असल्याने त्यातील गोष्टी वाचताना वाचक या पुस्तकांच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही हे निश्‍चित! ‘मजेदार कथा’ या पुस्तकात एकूण सात छोट्या…

पुढे वाचा