राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?

राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?

संसदीय लोकशाहीला सुरूवात होऊन फार काळ उलटला नसल्याने आपल्याकडे राजकीय पक्षांचा इतिहास तसा जुना नाही. राजेशाही संपली, सरंजामशाही संपली, संस्थाने खालसा झाली आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या त्या ध्येयवादी गटाने पुढाकार घेत आपापल्या विचारधारांचे गट स्थापन केले. त्यांना राजकीय पक्षांचे स्वरूप आले. लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. किमान तसा भास निर्माण करण्यात आला. त्यातून आपल्या लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. पूर्वीच्या काळातल्या टोळ्या नष्ट झाल्या आणि विचारसमूह अस्तित्वात आले. आजचे चित्र पाहता या पक्षांच्या पुन्हा टोळ्या झाल्यात की काय? असे वाटावे इतके झपाट्याने हे चित्र बदलले आहे.

पुढे वाचा

भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी व्यक्त केले. भाजपच्या नगरसेविका सौ. आरती कोंढरे यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि…

पुढे वाचा