‘चपराक’ साप्ताहिकासाठी दर आठवड्याला एक तरी वाचनीय लेख तुम्ही लिहावा, अशी प्रेमळ ताकीद संपादकांकडून मिळाली आणि मग सर्वसामान्य माणसाला (कॉमन मॅन) डोळ्यासमोर ठेवून, दैनंदिन जीवनात त्याला पडणारे निरनिराळे प्रश्न, त्यांच्या समस्या याविषयी लिहित गेलो. आपण एकटे का पडतो? माणसं अशी का वागतात? आजचे शिक्षक गुरू कधी होणार? तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे का? इतका आटापिटा कशासाठी? ग्राहक राजा कधी होणार? ही जीवघेणी लालसा कधी थांबणार?
पुढे वाचाTag: Ghanashyam Patil
शेतीबाडीच्या कविता
साहित्य चपराक’चे सहसंपादक आणि प्रतिभावंत कवी माधव गिर यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे दोन अस्सल कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड वाचकप्रियता लाभली. शेती आणि शेतकर्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शेतीबाडी’ या अष्टाक्षरी खंडकाव्यात त्यांनी अनेक प्रश्न सुहृदयतेने हाताळले आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले गिर सर स्वतः शेतकरी असल्याने त्यात शेतकर्यांच्या सुखदुःखाचे प्रतिबिंब लखलखीतपणे उमटले आहे. सध्याच्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्या ‘शेतीबाडी’तील काही रचना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी. आपल्याला त्या आवडतील याची खात्री आहेच. या कवितांवरील आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा; तसेच या कविता जास्तीत जास्त शेअर करा. जातीचा मी शेतकरी …
पुढे वाचास्वामिनाथन आयोग नेमका काय आहे?
मागील दोन दिवसापासून विविध मागण्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात आहे; परंतु हा स्वामिनाथन आयोग नेमका आहे काय, त्यांच्या शिफारशी काय आहेत हे फारसं कोणाला माहीत नाही. म्हणूनच त्यावर थोडासा प्रकाश टाकत आहोत.
पुढे वाचाकांदा गडगडला; शेतकरी कळवळला…
सध्या राज्यातील माध्यमांमध्ये एकच विषय रेटला जातोय तो म्हणजे राज्यसरकारकडून शेतकर्याच्या ’हातावर देण्यात आलेल्या तुरीचा.’ मात्र वास्तवापासून माध्यमं जाणीवपूर्वक कोसोदूर राहताहेत की त्यांचे आकलन कमी पडतेय हेच कळत नाहीय. कारण नाशिवंत असलेल्या कांद्याचा भाव दीड रुपयावर येऊन ठेपला असतानाही माध्यमं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतमालाच्या बाबतीत कांदा हा अल्पायुषी आहे तर तूर ही दीर्घायुषी आहे. असं असतानासुध्दा काही चार-दोन माध्यमं सोडली तर सर्वांनी सरसकट तुरीवर ताव मारायला सुरुवात केलीय. यातून नक्की कोणाचे फावणार आहे? याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? माध्यमं या विषयावर इतके आक्रमक का झालेत? या तूरकोंडीला केवळ…
पुढे वाचा