सदोबांचं बेगडी इतिहासप्रेम

महाराष्ट्रात विचारवंतांची कमतरता नाही. त्यातही पुणे शहरात तर नाहीच नाही. इथे एक विचारवंत शोधा; तुम्हाला दहा मिळतील. अशाच ‘विचारवंतांपैकी’ एक आहेत डॉ. सदानंद मोरे. ते घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. तत्त्वज्ञानात रमतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते देहूकर मोरे आहेत आणि थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख‘ असे रामदास स्वामींनी म्हटले असले तरी सध्या कोण कुणाचा वारसदार आहे हे सांगावे लागते. कुणी कुणाच्या संपत्तीचा वारसदार असते; तर कुणी विचारांचा! सदानंद मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे म्हणायला…

पुढे वाचा

लोककवी मनमोहन

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत.

पुढे वाचा