भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता. मी आणि माझा नातू भारत सामना पाहण्यासाठी कारमध्ये बसून निघालो. भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती. मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहर्यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून लक्ष वेधून घेत होते.
पुढे वाचाTag: children magazine
लाडोबांचा लाडोबा!
‘चपराक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेला, बालकांना मोहिनी घालणारा दिवाळी अंक म्हणजे लाडोबा! चपराक प्रकाशन, पुणे यांची अतिशय आकर्षक अशी ही निर्मिती! लाडोबा ह्या अंकात घराघरातील लाडोबांना साहित्याची नाविन्यपूर्ण मेजवानी संपादक घनश्याम पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे लाडोबा लाडक्या वाचकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!
पुढे वाचा