उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! विश्‍वंभर भटजींची गोष्ट

Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

गेल्या महिना अखेरची गोष्ट आहे. फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यमात माझ्या दोन मित्रांची मते वाचायला मिळाली. त्यातही गंमत अशी, ही नंतर आलेल्या मताला तीन दिवस आधीच एका मित्राने जणू उत्तर देऊन ठेवलेले होते. पहिला मित्र बालाजी सुतार कवी, साहित्यिक आहे आणि निरागस पुरोगामी आहे. त्याने म्हटले आहे, ‘की माझ्या राजकीय विचारांशी अजिबात न जुळणारी मते बाळगून असलेले, माझे ज्येष्ठ मित्र भाऊ तोरसेकर, अश्विनी मयेकर आणि समवयस्क आशिष चासकर, संदीप पटेल आणि आणखीही अनेक मित्रांना माझ्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. माझी अनेक सुखदु:खं मी यांच्याशी शेअर करतो.

पुढे वाचा