हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला ! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, “स्नानसंध्या आटोपून येतो…”
सैनिक म्हणाले, “असेल तसे या, असा निरोप आहे.”
हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, “यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी केली तर ती फक्त भगवंताची करेन !”
इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी सांगितलं, “आपल्या
वंशात इथून पुढे सात पिढ्या कुणीही सरकारी नोकरी करू नये ! केल्यास तो निपुत्रिक राहील.”
ते वचन आजची त्यांचे वंशज तंतोतंत पाळतात. ते केवळ भजन, कीर्तन करूनच आपला उदरनिर्वाह भागवतात.
त्यानंतर त्यांनी भगवंतभक्तीसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. महाराष्ट्रातील १६८ आणि महाराष्ट्राबाहेरील ११६ अशी २८४ संतचरित्रे काव्यमय शैलीत लिहिली. या संतचरित्राशिवाय त्यांच्या स्फूट रचनाही मोठ्या आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘पांडुरंग महात्म्य’ अत्यंत भक्तीरसपूर्ण आहे. पांडुरंगाविषयी इतकं लिहून ते समाधानी झाले असं नाही. त्यामुळं त्यांनी ‘पंढरीमहात्म्य’ आणि ‘पांडुरंगस्त्रोत ही लिहिले. आज आपल्याला असंख्य संतांची चरित्रे कळतात ती त्यांच्यामुळेच! या संतांच्या कवींचं नाव म्हणजे, संत महिपतीबुवा ताहाराबादकर। १७१५ ते १७९० हा त्यांचा कालखंड मात्र त्यांनी जे संतसाहित्य लिहून ठेवलं आहे ते काळाच्या खूप पुढचं आणि म्हणूनच अजरामर ठरणार आहे.
त्यांचे मूळ आडनाव कांबळे, वडिलांचे नाव दासोपंत. मंगळवेढधाचे कांबळे नगर जिल्ह्यातील ताहाराबादला स्थायिक झाले. मुलबाळ नसल्याने ‘आपल्यानंतर पंढरीची वारी कोण करणार?’ असा प्रश्न पडून ते अस्वस्थ झाले. अत्यंत आर्ततेनं त्यांनी त्यांचं गान्हाणं पांडुरंगापुढं मांडलं आणि वयाच्या साठीनंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव ‘महिपती!’ याच मुलानं पुढे वारकरी संप्रदायात भरीव योगदान दिलं. जे कोणी संत हयात असतील त्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांची काव्यमव चरित्र लिहिली. वे हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांना, नातलगांना, मित्रांना भेटून त्यांनी आपलं लेखनकार्य पुढे नेलं. “आपले गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला आणि त्यांनी फर्मावलं की ‘तू संतचरित्रे वर्णन कर’ म्हणून मी इकडे वळलो” असं त्यांचं म्हणणं.
संत महिपतींनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत गोरोबा, संत चोखोबा, संत कबीर, बोधलेबुवा, गणेशनाथ उद्धव, चिद्धन, विसोबा खेचर, संत सेना महाराज, संत रोहिदास अशा संतांची रसाळ चरित्रे लिहिली आहेत. त्यांचे भक्तविजय, कथा सारामृत, भक्तन्लीलामृत, संतलीलामृत, संत विजय हे आणि असे अनेक ग्रंथ वारकरी संप्रदायात प्राथः स्मरणीय आहेत. शिवाय त्यांनी लिहिलेलं पंढरी महात्म्य, अनंतव्रतकथा, दत्तात्रेय जन्म, तुळशी महात्म्य, गणेशपुराण, पांडुरंगखोत, मुक्ताभरणकथा, ऋषिपंचमी महात्म्य, अपराधनिवेदन स्रोत या स्फुटांसह अनेक अभंग, आरत्या, पदे, सारांश ज्ञानेश्वरी असं लेखन केलं.
पूर्वी आपल्याकडे देवांची चरित्रे गायली जात, महिपतींनी देवांचे मूर्त रूप असलेल्या संतांची चरित्रे गायिली. त्यामुळेच ते ‘संतांचे कवी’ झाले. मराठी संतसाहित्यात त्यांनी जे अवर्णनीय योगदान दिलं ते म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.
वारकरी संप्रदायात त्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. दादोपंतांची पंढरीची वारी महिपतीबुवांनी पुढे चालू ठेवली, वृद्धावस्थेत ते पंढरपूरला वारीला गेले. त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी आर्तपणे सांगितलं की, “हे पांडुरंगा, यापुढे म्हातारपणामुळे बारीसाठी तुझ्या दर्शनास येण्यास अंतरेल असे वाटते. तेव्हा मला क्षमा कर व तुइया दर्शनाची माझी आसक्ती कायम अशीच राहू दे…”
त्यानंतर विठ्ठलाने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, “आषाढ शूद्ध एकादशीस भक्त मला भेटावयास पंढरपूरला
येतात. आषाढ वद्य एकादशीस मी तुला ताहाराबादेस येऊन दर्शन देईन!”
त्यानंतर सकाळी बुवांनी चंद्रभागेत स्नान केले. त्यावेळी त्यांना चंद्रभागेत श्री विठ्ठलाची वाळुमिश्रीत पाषाणाची मूर्ती सापडली. ती त्यांनी ताहाराबादला आणून, प्राणप्रतिष्ठापना करून विठ्ठलाचे मंदीर बांधले. आजही ही मूर्ती ताहाराबाद येथे पाहावयास मिळते. भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव ही कल्पनाच तर आपल्या वैभवशाली परंपरेचा भाग आहे.
महिपतींनी श्री विठ्ठलाला जे पत्र लिहिले त्यात त्यांची आर्त भक्ती दिसून येते. ते लिहितात, “विठ्ठला, चित्तवृत्ती तुझे पायी ठेवली आहे. त्रितापाचे आपात या देहाने किती सोसावेत? ते या पत्रात किती लिहावेत? शरीरात शक्ती नाही. इतका शीण झालो आहे की, हातात लेखणी घरवत नाही. देवा, या देहाचा संबंध तोड. तुझ्या पायाशी ठाव दे. वाचेने आणखी बोलता येत नाही. मागे अंतकाळी जसा भक्तास पावलास तसा मला पाव.”
संत महिपतींनी १७९० साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी श्रावण वद्य द्वादशीला ताहाराबाद येथे समाधी घेतली. आषाढ वद्य त्रयोदशीला तेथे फार मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तिथे जमून महिपतींच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. तिथे त्यांच्या नावाने एक ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून सुंदर मंदिर बांधले आहे.
आजही वारकरी संप्रदायात संत महिपतीबुवांचे दाखले दिल्याशिवाय कीर्तनकारांना पुढे जाता येत नाही. जर संत महिपती नसते तर कित्येक संतांची कामे सोडा त्यांची नावेही आपल्याला कळली नसती. ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे’, असे म्हणताना ही संत परंपरा जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या संत महिपती बुवांविषयी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लेखन केले आहे. प्राचार्य डॉ. रमेश आवलगांवकर, डॉ. वा. ना. उत्पात, विद्याधर ताठे, महिपतींचे वंशज अविनाश कांबळे, माझे स्नेही दत्तात्रय नाईकवाडे, दत्तात्रय गायकवाड अशा काहींनी वेळोवेळी प्रसंगानुरूप त्यांच्याविषयी लिहिले आहे. राहुरी येथील श्री. ज्ञानेश्वर आणि शामबाला माने यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर एक चित्रपटही निर्माण केला होता मात्र तरीही अनेक संतांना प्रकाशझोतात आणणारे संत महिपती आजच्या पिढीपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे आपले दुर्दैव आहे. किमान वारकरी संप्रदायातील काही जाणकारांनी पुढाकार घेत संत महिपतींच्या नावे काही उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारीही काही प्रयत्न झाले तर या थोर संत चरित्रकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल.
-घनश्याम पाटील
लेखक, संपादक, प्रकाशक
संपर्क – ७०५७२९२०९२
‘साहित्य चपराक’ मासिक फेब्रु २०२५ : साहित्य संमेलन विशेषांक
The Poet of Saints, Sant Mahipati
The era was one of Muslim dominion, and Taharabad in the district of Nagar was under their jagir. One fateful day, the jagirdar urgently summoned his accountant. At that moment, the accountant was immersed in his daily prayers. He conveyed to the soldier who delivered the summons, “I shall come after completing my ritual ablutions.”
The soldier retorted, “Come as you are; such is the urgent decree.”
Reluctantly, the accountant interrupted his devotions and proceeded to the jagirdar. Having finalised the accounts, he promptly tendered his resignation, declaring, “Your service is no longer my desire! If I am to serve, it shall be only the Divine!”
His resolve extended further as he proclaimed, “For seven generations hence, none in our lineage shall undertake government service! To do so will invite the misfortune of childlessness.”
To this day, his descendants adhere scrupulously to this solemn vow, sustaining themselves solely through the recitation of bhajans and kirtans.
Following this pivotal decision, he dedicated his life entirely to pursuing divine devotion. His literary output includes an impressive 284 poetic biographies of saints, comprising 168 from Maharashtra and 116 from beyond its borders. Beyond these hagiographies, his miscellaneous compositions are also substantial. His work, ‘Pandurang Mahatmya,’ is imbued with profound devotional sentiment. Not content with his extensive writings on Panduranga, he further penned ‘Pandharimahatmya’ and the ‘Pandurang Stotra.’ It is largely through his efforts that the lives of countless saints are known to us today. This remarkable poet of saints was Sant Mahipati Buwa Taharabadkar, whose earthly sojourn spanned from 1715 to 1790. Yet, the saintly literature he bequeathed to posterity transcends his time, ensuring its enduring legacy.
Born into the Kamble lineage, with his father named Dasopant, their family hailed from Mangalvedha before establishing themselves in Taharabad, Nagar district. The absence of offspring caused him deep unease, prompting the poignant question, “Who will continue the pilgrimage to Pandhari after me?” In fervent supplication, he voiced his yearning before Panduranga. In his sixtieth year, he was blessed with a son named ‘Mahipati!’ This son would later contribute significantly to the Warkari Sampradaya. With diligent effort, he sought out living saints, engaging them in conversations to meticulously document their lives in verse. For those who had passed on, he connected with their families, relatives, and friends to further his biographical endeavours. He attributed his calling to a divine vision, stating, “My guru, Sant Tukaram Maharaj, appeared to me in a dream and commanded me to ‘describe the lives of the saints,’ and thus I embarked on this path.”
Sant Mahipati’s literary contributions include eloquent biographies of revered figures such as Sant Namdev, Sant Dnyaneshwar, Sant Tukaram, Sant Muktai, Sant Goroba, Sant Chokhoba, Sant Kabir, Bodhalebuwa, Ganesh Nath Uddhav, Chiddhan, Visoba Khechar, Sant Sena Maharaj, Sant Rohidas, and numerous others. His works like ‘Bhaktavijay,’ ‘Katha Saramrut,’ ‘Bhaktalilamrut,’ ‘Santlilamrut,’ and ‘Sant Vijay’ hold a place of reverence within the Warkari tradition, often recited in morning prayers. Additionally, his prolific output encompasses ‘Pandhari Mahatmya,’ ‘Anantavratakatha,’ ‘Dattatreya Janma,’ ‘Tulshi Mahatmya,’ ‘Ganesh Puran,’ ‘Pandurang Khot,’ ‘Muktabharankatha,’ ‘Rishipanchami Mahatmya,’ and ‘Aparadhanivedan Stotra,’ alongside countless abhangas, aartis, padas, and a concise commentary on the Dnyaneshwari.
While earlier traditions focused on singing the praises of deities, Mahipati uniquely chronicled the lives of saints, who were considered living embodiments of the divine. This earned him the esteemed title of ‘Poet of Saints.’ His unparalleled contribution to Marathi saint literature remains profoundly significant.
A cherished anecdote within the Warkari tradition recounts that Mahipati Buwa faithfully continued his father Dadopant’s pilgrimage to Pandhari. In his advanced years, during a visit to Pandharpur, he offered a heartfelt plea after beholding Vitthala, saying, “O Panduranga, it seems that the infirmities of old age will soon prevent me from coming for your darshan. I beseech your forgiveness and pray that my yearning for your divine presence remains unwavering…”
Subsequently, Vitthala graced him with a dream vision, proclaiming, “Devotees come to meet me in Pandharpur on Ashadh Shukla Ekadashi. On Ashadh Vadya Ekadashi, I shall personally come to Taharabad to grant you my darshan!”
The following morning, Buwa bathed in the sacred Chandrabhaga River. There, he discovered an exquisite idol of Shri Vitthala, formed of sand and stone. He reverently brought it to Taharabad, consecrated it, and established a temple dedicated to Vitthala. This very idol can still be venerated in Taharabad today, a testament to the enduring belief in a God who rushes to the call of his devotees – a cornerstone of our rich spiritual heritage.
The letter penned by Mahipati to Shri Vitthala poignantly reveals the depth of his devotion. He writes, “O Vitthala, my entire being is anchored at your feet. How much longer must this mortal frame endure the torment of the three afflictions? How can I adequately express it in this letter? My body is devoid of strength; weariness prevents me from even holding a pen. O Lord, sever my earthly bonds and grant me refuge at your feet. My voice falters, unable to speak further. As you have always come to the aid of your devotees in their final moments, so too, extend your grace to me.”
Sant Mahipati attained Samadhi in Taharabad on Shravan Vadya Dwadashi in the year 1790, at the age of seventy-five. On Ashadh Vadya Trayodashi, a grand pilgrimage converges at his समाधी, drawing thousands of devout pilgrims who gather to pay their respects with profound devotion. A trust established in his name maintains a beautiful temple at the site.
Even in contemporary times, Kirtankars within the Warkari tradition invariably invoke the teachings and life of Sant Mahipati Buwa as an essential foundation for their narrations. Had it not been for Sant Mahipati’s tireless efforts, the names and works of countless saints would have remained unknown to us. While Maharashtra is hailed as the ‘land of saints,’ the invaluable contribution of Sant Mahipati Buwa in preserving this sacred lineage has been eloquently documented by the esteemed scholar of saint literature, Dr. R. Chintamani Dhere. Principal Dr. Ramesh Avalgaonkar, Dr. V. N. Utpat, Vidyadhar Tathe, Mahipati’s descendant Avinash Kamble, and my esteemed friends Dattatraya Naikwade and Dattatraya Gaikwad have also illuminated aspects of his life and work on various occasions. Furthermore, Shri. Dnyaneshwar and Shrimati Shyamabala Mane from Rahuri spearheaded the creation of a film dedicated to him. Yet, despite these efforts, Sant Mahipati, the very luminary who brought numerous saints into the light, remains largely unknown to today’s generation – a regrettable oversight. At least knowledgeable members of the Warkari tradition must take the initiative to launch endeavours in the name of Sant Mahipati. Through their efforts, and with potential governmental support, we can collectively express our gratitude to this extraordinary biographer of saints.
-Ghanshyam Patil
Author, Editor, Publisher
Contact – 7057292092
“Sahitya Chaprak” Monthly February 2025 : Special Issue on Sahitya Sammelan, Delhi ( Literature Convention )
Awesome https://is.gd/N1ikS2
Good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Good https://is.gd/N1ikS2