संतकवी महिपती महाराज

Share this post on:

या वर्षी प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे महाकुंभाचे भव्यदिव्य आयोजन सुरू आहे. त्या निमित्ताने भारतच नव्हे, तर या संपूर्ण जगातील हिंदू या महाकुंभात गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत आणि सर्वच जगभरातील लोक या महापर्वाकडे दिव्यतेची अनुभूती घेत पाहत आहेत. याच मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केले जात आहे. त्यात संपूर्ण भारतातील मराठी माणसे सहभागी झालेली आहेत आणि माऊलींच्या मराठी साहित्यिकांच्या ज्ञानामृतात स्नान करून विचार शुद्ध करणार आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणून आता जरी अधिकृत मान्यता मिळाली असली, तरी ती अभिजात म्हणून नावारूपाला आणली ती संतमंडळींच्या ओव्या, अभंग, कथा, चरित्र, भारुडांनी, कवींच्या कवितांनी, फटक्यांनी, चारोळ्यांनी, इतिहासकारांच्या बखरी आणि राजदरबारातील पत्रांनी, शेतावर, जात्यावर, समुद्रातील शिडांवर, कुंभाराच्या चाकांवर, कुणब्याच्या गोटेवर, लोहाराच्या भात्यावर आणि अठरा पगड जातीत गायल्या गेलेल्या गाण्यांमुळे! या साहित्य संमेलनात खूप पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. घनश्यामदादा मला म्हणाले, “यावेळी साहित्य संमेलनातील प्रकाशन कट्ट्याला संतकवी महिपती महाराज हे नाव द्यायचा विचार सुरू आहे,” हे ऐकून मला फार आनंद झाला. या निमित्ताने संतकवी महिपती महाराजांचे साहित्य सर्वदूर जाईल व त्यांच्या योगदानाची माहिती साहित्यिक जगतात, वारकरी संप्रदायात आणि अवघ्या महाराष्ट्राला, नव्हे तर दिल्लीतील होणाऱ्या संमेलनामुळे भारतातील जनतेला होईल.

मी नोकरीसाठी मध्यंतरी अमेरिकेत वास्तव्यास होतो. कोरोना काळात तेथे ‘वेध’ या महाराष्ट्रातील परंतु अमेरिकेत राहणाऱ्या लोकांच्या संस्थेने मराठीतील वेगवेगळे आयाम समजून घेण्यासाठी पाक्षिक दूरदृकश्राव्य बैठकीच्या माध्यमातून व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन केले होते. त्यावेळी संत साहित्यातील संत चरित्रांवर मी एक व्याख्यान दिले होते. त्या संदर्भात मी वेगवेगळे संदर्भ शोधत होतो. वारकरी संप्रदायातील बहुतांश संतसाहित्य ग्रंथ, अभंग, गवळणी, भारुडे, ओव्या या आपणाला संतांनी त्यांनी लिहिलेल्या अनेकविध उपलब्ध ग्रंथांमधून समजतात, परंतु स्वप्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या संतांचे जीवन चरित्र आता आपणाला कोठून उपलब्ध होईल? भारतातील वेगवेगळ्या संत चरित्रांचा अधिकृत संदर्भ कोठे शोधायचा? हा प्रश्न मलाही होता, परंतु याचे उत्तरही मला पूर्वीच संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, जे आज वारकरी संप्रदायाची सेवा व संघटन करतात, त्यांच्याकडून मिळाले होते. एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली व परिचय करून देताना महिपतीबुवांच्या ताहाराबाद गावचा मी आहे, असे त्यांना सांगितले, कारण ताहाराबाद नावाची आणखी काही गावे आहेत, पण संत महिपतीबुवा ही गावाची ओळख तालुका पंचक्रोशीत आहे. मी हे सांगताच ते म्हणाले, “वाह! म्हणजे तुम्ही तुकोबांचे चरित्र लिहिणाऱ्या संतांच्या गावचे!”

ते म्हणाले, आज देहूतील त्यांचे वंशज व वारकरी संप्रदायातील जाणकार लोक देखील तुकोबांचे चरित्र सर्वाधिक प्रमाणित म्हणून महिपती महाराजांच्या लेखनाकडे पाहतात. महाराष्ट्रात संत नामदेव, माहिमभट्ट, संत एकनाथ, सरस्वती गंगाधर, दासोपंत, मुक्तेश्वर आणि दासगणू महाराज यांनी काही प्रमाणात संत चरित्र लेखन केल्याचे पाहायला मिळते. संतकवी महिपती महाराज यांनी संपूर्ण भारतातील २८४ हून अधिक संतांची चरित्रे लिहिली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत चरित्र लिहिणारे हे जगातील एकमेव संत साहित्यिक आहेत, असे म्हणता येईल. संत महिपतींनी लिहिलेल्या ‘भक्त विजय’ ग्रंथाचे दक्षिण भारतात ‘श्री महाभक्त विजयम’ या तेथील भाषेत भाषांतरित केले गेले व तो प्रसिद्ध झाला. उत्तरेतील संतांचा दक्षिणेतील लोकांना परिचय करून देण्याचेही काम महिपतींच्या साहित्यामुळे शक्य झाल्याचे दिसून येते, परंतु दुर्दैवाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत चरित्रांचे लेखन करून काळाच्या ओघात नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी आजीवन लेखणी व जीवन झिजवून हा अनमोल ठेवा आपणासाठी उपलब्ध करून दिलेल्या संताची मात्र फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.

मागे एकदा माझे मित्र ‘चपराक’चे संपादक घनश्याम (दादा) पाटील पुण्यात आईबाबांना भेटण्यासाठी २०११ ला घरी आले होते. ते परिचय करून देताना ‘गावातील बात्रा गोपाळकाल्याच्या कार्यक्रमासाठी या,’ असे म्हणाले, तेव्हा पार्श्वभूमी सांगत महिपती महाराजांनी लिहिलेल्या ‘संत लीलामृत’, ‘भक्त विजय’ या चरित्र ग्रंथांचा उल्लेख केला. त्यावेळी ते म्हणाले की, “महिपतीबुवांचे नाच मी ऐकलेले आहेत, परंतु त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती नाही व ती सर्वांनाच व्हावी यासाठी पुढील महिन्याचे ‘साहित्य चपराक’ मासिक आपण महिपती महाराज विशेषांक म्हणून प्रकाशित करूयात!”

अंकासाठी महिपती महाराजांविषयी माहिती गोळा करायला आम्ही सुरुवात केली. पुणे विद्यापीठात मराठी विभागात कोणाला याविषयी माहिती आहे, ते पाहण्यासाठी गेलो. तेथे माहिती मिळाली की ४-५ जणांनी महिपतींच्या साहित्यावर पीएचडी केली आहे. त्यांच्यापैकी एक जण म्हणाले, “मला आनंद वाटतोय, मला एवढ्या वर्षानंतर कोणी आवडत्या विषयावर लेख लिहिण्यासाठी आग्रह करत आहे.” नामवंत मराठी साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ताहाराबादी जाऊन, तेथे राहून संत महिपतींची माहिती संकलित केली आहे. सरस्वती मंदिर संस्थेचे प्राचार्य आवलगावकर सर, पंढरपूरचे विद्वान डॉ. वा. ना. उत्पात, महिपतींचे वंशज, महिपतींवरील सिनेमाचे लेखक व गावातील जाणकार यांच्याकडून लेख व माहिती संकलित करून त्या वर्षीच्या गोपाळकाल्यात कीर्तनकार डोंगरे महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विशेषांकाला सुंदर प्रतिसाद मिळाला. खूप जणांनी तो अंक विकत घेतला. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालये व वाचकांपर्यंत ही माहिती पोहोचली.

केवळ देशातीलच अभ्यासकांना महिपतीच्या लेखनाची भुरळ पडली, असे नाही. अमेरिकेतील एक मिशनरी भारतात आले होते, जस्टीन बट. त्यांना तर हे ग्रंथ एवढे आवडले की त्यांनी इंग्रजीत भाषांतर करून ‘स्टोरीज ऑफ इंडियन संत’ आदी पुस्तके लिहून अमेरिकेत प्रसिद्ध केली व त्यांची विक्री केली. या साहित्याचा व चरित्रांचा एवढा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला की त्यांनी मृत्युपत्रात संपत्तीचा मोठा हिस्सा वारकरी संत साहित्यिक संस्थांसाठी जाहीर केला व मृत्यूनंतर त्यांच्या देहाला पुरण्याऐवजी भडाग्नी देण्यात यावा व अस्थी घराच्या बागेत पुरावेत, असे लिहून ठेवले.

१९१९ मध्ये ‘टेल्स ऑफ द संतस् ऑफ पंढरपूर बाय महिपती’ हे पुस्तक सी. ए. किनकैड या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मुद्रणालयाने प्रकाशित केले आहे. असे अनेक पाश्चात्त्य लेखक इंटरनेटवर आपल्याला सापडतील. अगदी आताही बरेच जण महिपती महाराजांच्या साहित्यावर अभ्यास करत आहेत व प्रबंध लिहीत आहेत.

दिल्लीत या उत्तरेकडील होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक प्रकारे संत साहित्याचेही संमेलन होईल. काही संत चरित्रे लिहिताना महिपतीबुवांनी भारताच्या उत्तरेतील संत नाभाजी दास लिखित ‘भक्तमाल’ या ग्रंथाचा संदर्भ घेतला आहे. त्यांनी १०८ हून अधिक संतांची चरित्रे लिहिली आहेत. त्या प्रांतातील लोकांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आता महाराष्ट्रातील संत कवी महिपती महाराजांचा परिचय होईल.

– दत्तात्रेय नाईकवाडे
श्री क्षेत्र ताहाराबाद

9028746492

‘साहित्य चपराक’ मासिक फेब्रुवारी २०२५ : साहित्य संमेलन विशेषांक

Saint-Poet Mahipati Maharaj

This year, Prayagraj in Uttar Pradesh is hosting a grand and magnificent Maha Kumbh Mela. Consequently, Hindus from not only India but also the entire world have converged at this sacred confluence to partake in the holy dip in the Ganges. People across the globe are observing this momentous occasion, experiencing a profound sense of divinity. Concurrently, the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (All India Marathi Literature Convention) is being organized in the capital city of Delhi. This event has drawn Marathi speakers from all corners of India, who will immerse themselves in the wisdom-filled words of Marathi literary luminaries, the ‘Maulis’ (revered guides), thereby purifying their thoughts. While Marathi has recently received official recognition as a classical language, its classical stature was truly established through the ovis (metrical verses), abhangas (devotional hymns), narratives, biographies, and bharuds (metaphorical songs) of the saints; the poems of the poets; the phatkas (satirical verses) and charolis (quatrains); the bakhars (historical chronicles) and royal court correspondence of the historians; the songs echoing in the fields and on grinding stones; the chants accompanying the sails at sea and the potter’s wheel; the melodies resonating in the farmer’s cattle sheds and at the blacksmith’s bellows; and the diverse musical expressions within the eighteen communities of the villages. This literary convention promises a significant number of book releases. Ghanshyam Dada shared with me a heartening prospect: “There’s a consideration to name the publication stall at this year’s Sahitya Sammelan after the revered saint-poet Mahipati Maharaj.” This news filled me with immense joy. This initiative will undoubtedly disseminate the literary works of Sant Mahipati Maharaj far and wide, bringing his invaluable contributions to the attention of the literary world, the Warkari sect, and not only the entirety of Maharashtra but also the broader Indian populace through the Delhi convention.

For a period, I resided in America for professional reasons. During the unprecedented times of the COVID-19 pandemic, ‘Vedh,’ an organisation of Maharashtrian expatriates in the USA, organized fortnightly audio-visual sessions featuring lectures and discussions aimed at exploring the multifaceted aspects of Marathi language and culture. During one such session, I delivered a lecture on the saint biographies within Marathi saint literature. In preparation, I delved into various reference materials. While the majority of saint literature – the abhangas, gavlani (milkmaid songs), bharuds, and ovis – within the Warkari tradition is accessible through the numerous extant works of the saints themselves, the question arose: where could one find authentic accounts of the lives of those self-effacing saints who shunned publicity? Where could one locate authoritative references for the diverse saint biographies across India? This was a question that lingered in my mind, but its answer had already been provided by Shivaji Maharaj More, a descendant of Sant Tukaram Maharaj, who currently dedicates himself to the service and organization of the Warkari sect. During an encounter at an event, while introducing myself, I mentioned my origin from Taharabad, the village of Mahipati Buwa. I clarified this because several villages bear the name Taharabad, but Sant Mahipati Buwa is the distinct identity of my village within the taluka and surrounding region. Upon hearing this, he exclaimed with enthusiasm, “Ah! So you are from the village of the saint who chronicled the life of Tukoba!”

He further remarked that even today, his descendants in Dehu and the learned individuals within the Warkari sect regard Mahipati Maharaj’s writings as the most authoritative account of Sant Tukaram’s life. While Maharashtra has witnessed some biographical work on saints by figures like Sant Namdev, Mahimbhatta, Sant Eknath, Saraswati Gangadhar, Dasopant, Mukteshwar, and Dasganu Maharaj, the saint-poet Mahipati Maharaj stands out for having penned the biographies of over 284 saints from across India. It can be asserted that he is the singular saint-writer globally who undertook such an extensive biographical project. Sant Mahipati’s ‘Bhakta Vijay’ has been translated into Tamil in South India as ‘Sri Mahabhakta Vijayam’ and has garnered significant recognition. Mahipati’s literary contributions played a crucial role in introducing the saints of North India to the people of the South. Regrettably, despite his monumental effort in chronicling the lives of so many saints, thereby rescuing their stories from oblivion, and dedicating his entire life to this invaluable literary endeavor, Sant Mahipati himself remains relatively unknown to the people of Maharashtra.

Some time ago, in 2011, my friend Ghanshyam (Dada) Patil, the editor of ‘Chaprak,’ visited his parents in Pune. While introducing himself, he extended an invitation to the village’s Batra Gopalkala program. In providing context, he mentioned the biographical works ‘Sant Lilamrut’ and ‘Bhakta Vijay’ written by Mahipati Maharaj. He then expressed, “I have heard of Mahipati Buwa’s devotional dances, but I lack comprehensive knowledge about his work, and to disseminate this information to a wider audience, we shall dedicate the subsequent month’s ‘Sahitya Chaprak’ monthly as a special issue on Mahipati Maharaj!”

We embarked on the task of gathering information about Mahipati Maharaj for this special issue. We approached the Marathi department at Pune University to ascertain if any scholars possessed expertise on the subject. We discovered that 4-5 individuals had pursued doctoral research on Mahipati’s literature. One of them expressed his delight, stating, “I am pleased that after so many years, someone is requesting me to contribute an article on my cherished subject.” The esteemed Marathi literary scholar Dr. R. Chintamani Dhere undertook the dedicated task of visiting and residing in Taharabad to meticulously collect information about Sant Mahipati. Articles and insights were also gathered from Principal Avalgaonkar Sir of Saraswati Mandir Sanstha, the learned Dr. V. N. Utpat of Pandharpur, Mahipati’s descendants, the writer of the film on Mahipati, and knowledgeable individuals from the village. The special issue was subsequently released during the Gopalkala program that year by the revered Kirtankar Dongre Maharaj and received a remarkable response. Numerous individuals purchased the issue, and this valuable information reached many libraries and readers across Maharashtra.

The allure of Mahipati’s writings extended beyond Indian scholars. An American missionary, Justin E. Abbott, who came to India, was so captivated by these texts that he translated them into English, publishing works such as ‘Stories of Indian Saints’ in America and disseminating them widely. The profound impact of this literature and these biographies on his life was such that he bequeathed a significant portion of his estate in his will to Warkari saint literary organizations and stipulated that, upon his death, his body should be cremated rather than buried, with his ashes interred in his home garden.

In 1919, ‘Tales of the Saints of Pandharpur by Mahipati was published by Oxford University Press under the imprint of C. A. Kincaid. Numerous Western authors with an interest in Mahipati can be found on the internet. Even currently, many scholars are actively engaged in studying and writing dissertations on Mahipati Maharaj’s literary contributions.

The upcoming Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Delhi, in a sense, will also be a confluence of saint literature. While composing some of his saint biographies, Mahipati Buwa drew reference from the ‘Bhaktamal’ written by the North Indian saint Nabha Ji Das, which chronicles the lives of over 108 saints. This literary convention will provide an invaluable opportunity for the people of that northern region to become acquainted with the saint-poet Mahipati Maharaj of Maharashtra.

-Dattatrey Naikwade

Shree Kshetra Taharabad

9028746492

‘Sahitya Chaprak’ Monthly February 2025: Special Issue on Marathi Sahitya Sammelah Delhi ( Literature Convention)

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!