ग्राहक राजा कधी होणार?

ग्राहक राजा कधी होणार?

– विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘ग्राहक राजा जागा हो’ किंवा ‘जागो ग्राहक जागो’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण दूरदर्शनवर सतत बघत असतो. ग्राहकाला इंग्रजीत ‘कस्टमर’ असे म्हणतात. म्हणजेच जो कष्ट करत करत मरतो तो कस्टमर असे गमतीने म्हटले जाते. खरं तर आपल्या भारतात ग्राहकाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही!

पुढे वाचा

माणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना

चपराक दिवाळी अंक 2012 एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं, असतील आठ-दहा वर्षांची. शाळा सुटल्याने आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं… अरे, चिन्या म्हटलं आज माझा वाढदिवस आहे.

पुढे वाचा

समर्पण

समर्पण

एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, ‘‘महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?’’ ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, ‘‘अगं आतून जरा कंदील घेऊन ये.’’

पुढे वाचा

सद्गुरू… सौख्याचा सागरू!

सद्गुरू... सौख्याचा सागरू!

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं… आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं!

पुढे वाचा