अग्निदिव्य – एका आईची संघर्षगाथा

माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठवाडी शैली. त्यात त्या इतक्या समरसून बोलत होत्या की आपण एखादा चित्रपट पाहतोय असंच वाटत होतं. अत्यंत चित्रदर्शी शैलीत त्या त्यांच्या…

पुढे वाचा

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ अभ्यासच आहे असे नाही तर ते जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून या महामानवांच्या विचारांचा प्रसार करतात. म्हणूनच त्यांची निवड…

पुढे वाचा

पायी वारीचा इतिहास

पायी वारीचा इतिहास

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्‍यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.

पुढे वाचा