दहावी नंतर काय करायचं? – डॉ. श्रीराम गीत

35% ते 65% मिळवून यशस्वी होणार्‍यांसाठी गरजेचे कोणताही अभ्यासक्रम शिकण्यासाठी एक अडचण असते. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत कुठला ना कुठला तरी क्लास लावून शिकत आलेलो असतो. ज्यांनी लावलेला नाही त्यांच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही पण असे विद्यार्थी फारच क्वचित सापडतात. ही अडचण अकरावी नंतरच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये बर्‍यापैकी उद्भवते. ज्या संस्थेच्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेतो त्यासाठीचे पैसे बँक कर्ज म्हणून देऊ शकते पण कोणत्याही क्लाससाठी किंवा खाजगी शिकवणीसाठी पैसे कोणीही देत नाही. केवळ याच कारणामुळे सायन्स, कॉमर्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या मुलांची फरपट होते. यश मिळत नाही. यावर काय उपाय आहे हे…

पुढे वाचा