चष्म्यामुळे झाला पराभव

केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात बाबासाहेब धाबेकर याच नावाने ते सुपरिचित होते. धाबे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुुरू झाला. पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जि. प. सदस्य, अकोला जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाचा काळ हा सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या अनेक योजना पुढे राज्यभर लागू झाल्या. आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली. 2009 साली त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली…

पुढे वाचा